Ganeshotsav Nashik : नाशिकच्या बाजारात दाखल झाली लाल मातीची मूर्ती, दरही परवडणारे, फायदेही आहेत अनेक

Last Updated:

मात्र आज साजरे होणारे गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानीकारक तर ठरत नाहीत ना, याकडे मात्र लक्ष देण्याची वेळ आली आहे.गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते.

+
लाल

लाल मातीची बाप्पाची मूर्ती

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : सर्वांच्या लाडक्या गणरायाचं काही दिवसातच आगमन होणार आहे. त्यामुळे नाशिकमधील बाजारात अनेक ठिकाणी गणेश मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे. भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव काळानुरूप बदलत आहे. मात्र, आज साजरे होणारे गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानीकारक तर ठरत नाहीत ना, याकडे मात्र लक्ष देण्याची वेळ आली आहे.
गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले. कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची, काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे.
advertisement
नाशिक येथे बाजारात पर्यावरणपूरक लाल मातीची मूर्ती पाहायला मिळत आहे. ही माती पर्यावरणपूरक असल्याने विसर्जनानंतर काही तासातच माती स्वरूपात होते आणि नंतर ती आपण झाडांनाही देऊ शकतो. या हेतूने सर्वजण या मूर्तीला पसंती देत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीने पर्यावरणाला मोठा धोका असल्याने जास्तीत जास्त शाडू मातीच्या गणेश मूर्तीला करा, असे आव्हानाचे देखील सर्वत्र होत असते. त्यामुळे गणेश भक्तांनीही आपल्या बाप्पाची मूर्ती ही शाडू मातीची घेणे आवश्यक असते.
advertisement
नाशिकमधील 70 वर्षे जुन्या असलेल्या नाशिकच्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती या नावाने असलेल्या दुकानातील लाल मातीच्या गणेशमूर्तीं अतिशय सुंदर अशा रुपात मिळत आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने कुठलेही केमिकल अथवा प्लास्टिक न वापरता सुंदर लाल मातीची गणेशमूर्ती याठिकाणी ते तयार करतात. तसेच यामुळे पर्यावरणाला कोणतेही नुकसान होत नाही. विसर्जनानंतर ही माती पाण्यात सहज विरघळते आणि निसर्गात पुन्हा एकत्र होते. ही मूर्ती माती होऊन झाडांनाही उपयोगी पडते.
advertisement
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या मूर्तींच्या किंमती खूपच वाजवी आहेत. उच्च गुणवत्तेची मूर्ती असूनही, या मूर्ती खरेदी करणं खिशाला परवडणारे आहे. तुमच्या बजेटमध्ये फिट बसेल अशी ही मूर्ती नक्कीच आहे. 500 रुपयांपासुन या ठिकाणी ही मूर्ती विक्रीस उपलब्ध आहे. विविध आकाराच्या, विविध डिजाईन्समध्ये याठिकाणी या मूर्ती उपलब्द आहे. तुम्हालाही पर्यावरणपूरक मूर्ती हवी असेल तर तुम्ही याठिकाणी नक्की भेट देऊ शकतात.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Ganeshotsav Nashik : नाशिकच्या बाजारात दाखल झाली लाल मातीची मूर्ती, दरही परवडणारे, फायदेही आहेत अनेक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement