काय आहे प्रकरण?
मराठा आरक्षणासाठी मुलाने आत्महत्या केल्याचा बनाव करून बापानेच खून केल्याचं गुन्हा जालना जिल्ह्यातल्या मुरमा गावात उघडकीस आली आहे. 23 फेब्रुवारी 2024 या दिवशी शिवप्रसाद महादेव थुटे याने मराठा आरक्षणासाठी राहत्या घरात गळफास घेतल्याची तक्रार तीर्थपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनास पाठवून नोंद केली होती. मात्र, त्याचा अहवाल आल्यानंतर त्याचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी मयताच्या आई वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असता बापानेच दारुच्या नशेत मुलाचा गळा दाबून खून केल्याचं उघडकीस आलं आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी वडील महादेव थुटे याला अटक केली असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
advertisement
वाचा - मूलबाळ होत नसल्याने पत्नीला सोडलं, दुसरं लग्न करताच पहिलीला आला राग, घडलं भयानक
स्वतःच्या बचावासाठी मराठा आरक्षण आंदोलनाचा वापर
गेल्या वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात मराठा समाजाचं मोठं आंदोलन उभं राहिलं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून हे आंदोलन राज्यभर परसलं. या काळात काही तरुण मुलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपला जीव दिल्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वीही झालेल्या आंदोलनादरम्यान, जवळपास 50 तरुणांना आरक्षणासाठी आपली जीवनयात्रा संपल्याचे समोर आले आहे. याच गोष्टीचा फायदा करुन घेण्याचा प्रयत्न आरोपीने केला. आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा बनाव करत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. मात्र, शवविद्धेचन अहवालाने अखेर गुन्हेगार बापाचं पितळ उघडं पडलं.