महाराष्ट्राचे कला वैभव जगासमोर आणण्यासाठी, तसेच नव्या पिढीला महाराष्ट्राची कला संस्कृती आणि लोककला माहीत हव्यात, म्हणून जेईएस महाविद्यालयाचा लोककला विभाग मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. मागील दोन वर्षांपासून जेईएस महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याच प्रशिक्षण शिबिराचा समारोप गुरुवारी महाविद्यालयात करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्स्फूर्त सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांची मन जिंकली.
advertisement
Cow or Buffalo Milk: गाय की म्हैस कोणतं दूध चांगलं? लहान मुलांबाबत ती चूक नको, आहार तज्ज्ञांचा सल्ला
महाराष्ट्रातील लोककला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस असतो. या लोककला विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आमचा प्रयत्न असतो. यामध्ये शाहिरी गण, तमाशा परंपरेतील गण, तमाशा परंपरेतील गवळण, यानंतर कोळीगीत, गोंधळ, भारुड, जागरण, लावणी असे सगळे कलाप्रकार आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो. लावणीमध्ये दोन कलाप्रकार असतात. पुरुषांची लावणी वेगळी असते. ती आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो. आणि हे सगळे केवळ दहा दिवसांमध्ये केले जाते. विद्यार्थी देखील अत्यंत कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने कला आत्मसात करतात याचा आनंद असल्याचे प्रशिक्षक आणि सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
मागील नऊ दिवसांपासून आम्ही ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध कलाप्रकार शिकलो. महाराष्ट्राची कला संस्कृती परंपरा या माध्यमातून आम्हाला माहीत झाल्या. अत्यंत कमी कालावधीमध्ये रामानंद उगले आणि कल्याण उगले यांनी आम्हाला वेगवेगळे कलाप्रकार शिकवले. या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाल्याचे समाधान असल्याचे प्रशिक्षणार्थी शोएब शेख याने सांगितले.





