Cow or Buffalo Milk: गाय की म्हैस कोणतं दूध चांगलं? लहान मुलांबाबत ती चूक नको, आहार तज्ज्ञांचा सल्ला
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Cow or Buffalo Milk: आपल्याकडे रोजच्या आहारात गाय आणि म्हैशीचं दूध वापरलं जातं. या दोन्ही दुधापैकी आरोग्यासाठी जास्त चांगलं दूध कोणतं? जाणून घेऊ.
छत्रपती संभाजीनगर: आपल्याकडे अनेकांच्या आहारातील दूध हा महत्त्वाचा घटक आहे. दूध घेणे हे आपल्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर असतं. त्यामधून भरपूर प्रमाणात पोषक घटक मिळत असतात. प्रामुख्याने आपल्याकडे गाय आणि म्हशीचं दूध वापरलं जातं. पण गाईचं दूध चांगलं की म्हशीचं असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबतच छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती दिलीये.
कोणतं दूध घ्यावं गाईचं की म्हशीचं?
आहारतज्ज्ञ सांगतात की, “गाईचं दूध आणि म्हशीचे दूध दोन्ही घेणं चांगलंच असतं. पण म्हशीच्या दुधापेक्षा गायीचं दूध घेणं हे केव्हाही चांगलं आहे. कारण त्यामध्ये कॅलरीज आणि फॅट कमी प्रमाणात असतात. त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. गाईचं दूध आणि आपलं मानवी दूध म्हणजेच आईचं दूध यामध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये साम्य आहे. त्यामुळे गाईचं दूध तुलनेनं फायदेशीर असतं.”
advertisement
लहान मुलांना कोणतं दूध द्यावं?
लहान मुलांना आणि वयोवृद्धांना गाईचं दूध दिलेलं केव्हाही चांगलं. तसंच म्हशीचं दूध हे खेळाडू किंवा ज्यांना मोठ्या प्रमाणात अंग मेहनतीची कामं करावी लागतात, अशा लोकांना द्यावं. कारण या दुधात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. तसेच हे पचायला देखील जड असतं. खेळाडू किंवा ज्यांची पचन संस्था चांगली आहे अशांनी हे दूध घेतलं तर त्यांना पचायला सोपं जातं. त्यामुळे हे दूध खेळाडूंनी घ्यावं, असं आहार तज्ज्ञ सांगतात.
advertisement
दरम्यान, गाय आणि म्हैस दोन्हीचं दूध लाभदायी आहे. मात्र, त्याचं प्रमाण योग्य असलं पाहिजे. तसेच अधिक कष्टाची कामं करणाऱ्यांना म्हशीचं तर लहान मुले आणि वृद्धांना पचण्यास हलकं असणारं गाईचं दूध जास्त चांगलं, असंही आहारतज्ज्ञ सांगतात. तसेच गाईचं दूध चांगलं म्हणून त्याचं अतिसेवन देखील करू नये, असा सल्ला देतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
June 05, 2025 2:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cow or Buffalo Milk: गाय की म्हैस कोणतं दूध चांगलं? लहान मुलांबाबत ती चूक नको, आहार तज्ज्ञांचा सल्ला