Traffic News : मुंबईत18 जानेवारीला वाहतुकीत मोठा बदल; कसा कराल प्रवास?पर्यायी मार्ग कोणते?वाचा सविस्तर

Last Updated:

Mumbai Traffic News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 18 जानेवारी रोजी शहरातील वाहतुकीत मोठा बदल होणार आहे. काही प्रमुख मार्गांवर वाहतूक वळवण्यात येणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

News18
News18
मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या रविवारी अर्थात 18 जानेवारी रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. या मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी दक्षिण आणि मध्य मुंबईत अनेक रस्ते बंद ठेवण्याचा तसेच वाहतूक वळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागांत प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आधीच नियोजन करूनच बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हजारो धावपटूंचा सहभाग
जानेवारी महिन्यात मुंबईत विविध सामाजिक संस्था आणि संघटनांकडून मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. मात्र टाटा मुंबई मॅरेथॉन ही शहरातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मॅरेथॉन मानली जाते. यंदा या मॅरेथॉनमध्ये फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 किलोमीटर धावणे, एलिट रेस, दिव्यांगांसाठी विशेष धावणे, ज्येष्ठ नागरिकांची धावणे तसेच ड्रीम रन अशा विविध शर्यतींचा समावेश असणार आहे. या सर्व शर्यतींमध्ये हजारो धावपटू सहभागी होणार आहेत.
advertisement
'या' मार्गावरुन वाहतूक बंद
मॅरेथॉनचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), आझाद मैदान, मरीन ड्राइव्ह, वरळी, दादर, माहीम, वांद्रे तसेच आसपासच्या महत्त्वाच्या रस्त्यांवरून जाणार आहे. धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. त्यानुसार 18 जानेवारी 2026 रोजी पहाटे 3 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत आपत्कालीन सेवा वगळता इतर वाहनांना अनेक प्रमुख रस्त्यांवर प्रवेश बंद असणार आहे.
advertisement
या काळात दक्षिण मुंबई, वरळी, माहीम आणि वांद्रे परिसरातील काही भाग नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Traffic News : मुंबईत18 जानेवारीला वाहतुकीत मोठा बदल; कसा कराल प्रवास?पर्यायी मार्ग कोणते?वाचा सविस्तर
Next Article
advertisement
ZP Election: आता शाई पुसून दाखवाच! जिल्हा परिषदसाठी निवडणूक आयोगाचा नवा प्लॅन तयार, घेतला मोठा निर्णय
आता शाई पुसून दाखवाच! जिल्हा परिषदसाठी निवडणूक आयोगाचा नवा प्लॅन तयार, घेतला मोठ
  • मतदारांच्या बोटावर लावलेली मार्करची शाई सहज पुसली जात असल्याचे आरोप

  • निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत मतदारांचा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार

View All
advertisement