छ. संभाजीनगरमध्ये मतमोजणीच्या दिवशी बाहेर पडताय? वाहतूक मार्गात मोठे बदल, जाणून घ्या अपडेट
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati sambhajinagar: मतमोजणी पूर्ण होईपर्यंत हे सर्व मार्ग बंद राहतील. यादरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे मतदान गुरुवारी, 15 जानेवारी रोजी पार पडलेले आहे आणि या महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल शुक्रवार, 16 जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्र परिसरातील तीन महत्त्वाचे रस्ते शुक्रवारी दिवसभर बंद राहणार आहेत.
मतमोजणीच्या काळात दंगा काबू पथक, एसआरपीएफचे 400 पेक्षा अधिक शस्त्रधारी जवान गर्दीला नियंत्रित करण्यासाठी मतमोजणी केंद्रांच्या परिसरात तैनात करण्यात आले आहेत. सकाळी 7 वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ होईल. मतदानासह मतमोजणी प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. गरवारे हायटेक फिल्म, उस्मानपुऱ्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये मतमोजणी पार पडेल.
advertisement
सर्व मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाइल, टॅबलेटचा वापर, देवाणघेवाण करता येणार नाही. निवडणुकीसंबंधी अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व निवडणूक नियुक्त कर्मचारी, वाहनांनाच प्रवेश असेल, असे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी काढले.
मतमोजणी पूर्ण होईपर्यंत हे सर्व मार्ग बंद राहतील. यादरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी केले आहे.
advertisement
हे मार्ग राहतील बंद
विट्स हॉटेल चौक ते गाडे चौक
एसएससी बोर्ड टी पॉइंट ते पीरबाजार चौकपर्यंत
सेव्हन हिल उड्डाणपूल पूर्व बाजू ते आकाशवाणी चौक रस्त्याची दक्षिण बाजू
(जालना- अहिल्यानगर मार्ग दिशा)
यादरम्यान आकाशवाणी चौक ते सेव्हन हिल उड्डाणपुलाची पूर्व बाजूची वाहतूक सुरू असेल.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 8:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छ. संभाजीनगरमध्ये मतमोजणीच्या दिवशी बाहेर पडताय? वाहतूक मार्गात मोठे बदल, जाणून घ्या अपडेट










