Monsoon Tips: रस्त्यावर साचलेलं पाणी ठरू शकतं जीवघेणं, पावसाळ्यात ती चूक पडेल महागात, Video

Last Updated:

Monsoon Health Care: पावसाळ्यात रस्त्यावर साचलेलं पाणी ही फक्त अडचण नाही, तर आरोग्यासाठी गंभीर धोका आहे. त्यासाठी वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.

+
Monsoon

Monsoon Tips: रस्त्यावर साचलेलं पाणी ठरू शकतं जीवघेणं, पावसाळ्यात ती चूक पडेल महागात, Video

मुंबई: पावसाळा सुरू झाला की रस्त्यांवर पाणी साचणे ही नित्याचीच बाब बनते. शहरांतील अपुरी गटार व्यवस्था आणि रस्त्यांची खराब अवस्था यामुळे अनेकदा नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून चालावं लागतं. मात्र, हे फक्त गैरसोयीचं नसून आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय धोकादायक आहे. साचलेल्या पाण्यात विषाणू, बॅक्टेरिया आणि इतर रोगजंतूंची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढलेली असते. अशा पाण्यातून चालणं किंवा त्याच्याशी थेट संपर्क आल्यास विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार होऊ शकतात. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
पावसाळ्यात होणारे आजार
साचलेल्या पाण्यात उंदीर किंवा इतर प्राण्यांच्या लघवीतून आलेले बॅक्टेरिया त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. तेव्हा लेप्टोस्पायरोसिस या रोगाला सामोरे जावे लागते. साचलेल्या पाण्यात डास वाढतात आणि त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया हे आजार होतात. डेंग्यू एडिस डासांमुळे, तर मलेरिया अ‍ॅनॉफिलीस डासांमुळे होतो. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो सारखे पोटाचे आजार होतात. तसेच हिवताप, टायफॉईड यासारखा आजारांचा सामाना देखील करावा लागू शकतो.
advertisement
रोगांची लक्षणे आणि उपाय
ताप, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, पुरळ, डोळ्यांत लाली अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा, शक्य असल्यास गम बूट किंवा बंद पादत्राणे वापरा. पाणी उकळून किंवा फिल्टर करूनच प्या. घराभोवती पाणी साचू देऊ नका; डास रोखण्यासाठी फवारणी करा. पूर्ण बाह्यांचे कपडे आणि मच्छरदाणी वापरा. शरीराला जखम असल्यास साचलेल्या पाण्याचा संपर्क होऊ नये, याची काळजी घ्या.
advertisement
साचलेलं पाणी ही फक्त अडचण नाही, तर गंभीर आरोग्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून स्वच्छता व सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. जर सांगितलेली लक्षणे दिसली तर दुर्लक्ष न करता तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Monsoon Tips: रस्त्यावर साचलेलं पाणी ठरू शकतं जीवघेणं, पावसाळ्यात ती चूक पडेल महागात, Video
Next Article
advertisement
BMC Election: ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दावा
ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दाव
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे.

  • ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये पडद्याआड हातमिळवणीबाबत घडामोडी सुरू असल्याचा दावा

  • भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप...

View All
advertisement