Surya Budh Yuti 2026: शनिवारी अमावस्या लागण्याआधी 10:27 AM पासून नशीब चमकणार; भाग्याची साथ 3 राशींना
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Surya Budh Yuti 2026 Horoscope: जानेवारी महिना सुरू झाल्यापासून ग्रह-नक्षत्रांची स्थिती विशेष मानली जात आहे. त्यातच आता दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी सूर्य आणि बुध या दोन ग्रहांची मकर राशीत युती होणार आहे. बुध सकाळी 10:27 वाजता मकर राशीत प्रवेश करेल आणि 3 फेब्रुवारीपर्यंत या राशीत राहील. सूर्य आधीच 14 जानेवारीपासून मकर राशीत विराजमान आहे.
advertisement
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा बुधादित्य राजयोग नशिबाची साथ देणारा ठरेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध सुधारल्यामुळे त्याचा फायदा प्रगतीसाठी होईल. बुधाच्या प्रभावामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन राशीच्या लोकांसाठी हा राजयोग कौटुंबिक सुख देणारा असेल. गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय चांगला असून भविष्यात त्यातून मोठा फायदा होऊ शकतो. सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि पैशांची अडचण भासणार नाही. तुमचे आरोग्य चांगले राहील, फक्त खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. करिअरच्या दृष्टीने नवीन संधी चालून येतील, जे अविवाहित आहेत त्यांना या काळात जोडीदार मिळण्याची दाट शक्यता आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








