विवाहिता एकटी असल्याचा घेतला फायदा; दोघं भाऊ घरात घुसले अन् नको ते केलं, आता घडली अद्दल

Last Updated:

पीडित महिला आणि आरोपी यांच्या कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपी महिलेच्या घरात घुसला

विवाहितेचा विनयभंग करणाऱ्याला शिक्षा (AI Image)
विवाहितेचा विनयभंग करणाऱ्याला शिक्षा (AI Image)
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील म्हाळुंगे (निमगाव सावा) येथे एका विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने कठोर धडा शिकवला आहे. घरात घुसून अश्लील कृत्य केल्याप्रकरणी आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
नेमकी घटना काय?
ही घटना १६ डिसेंबर २०१५ रोजी घडली होती. पीडित महिला आणि आरोपी यांच्या कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपी महिलेच्या घरात घुसला होता. त्यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने महिलेला शिवीगाळ केली आणि तिचा विनयभंग केला. इतकंच नव्हे, तर या वादात आरोपीच्या भावानेही पीडित विवाहितेला मारहाण केली होती. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेनं जुन्नर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.
advertisement
न्यायालयाचा निकाल: गेल्या नऊ वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. विनयभंग केल्याप्रकरणी या प्रकरणातील मुख्य आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, आरोपीच्या भावाने मारहाण केल्याप्रकरणी त्याला १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
advertisement
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि घरात घुसून दहशत माजवणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी न्यायालयाचा हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
विवाहिता एकटी असल्याचा घेतला फायदा; दोघं भाऊ घरात घुसले अन् नको ते केलं, आता घडली अद्दल
Next Article
advertisement
BMC Election: ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दावा
ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दाव
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे.

  • ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये पडद्याआड हातमिळवणीबाबत घडामोडी सुरू असल्याचा दावा

  • भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप...

View All
advertisement