Kolhapur Election Live Update: कोल्हापुरात सतेज पाटील यांना धक्का, प्रभाग क्रमांक 9चा निकाल जाहीर; काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले शारंगधर देशमुख विजयी

Last Updated:

Kolhapur Municipal Corporation Election Live Update: कोल्हापूर महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. शांततेत पार पडलेल्या मतदानानंतर आता महायुतीसह सर्व आघाड्यांचे राजकीय भवितव्य या निकालातून स्पष्ट होणार आहे.

News18
News18
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत गुरुवारी मतदान शांततेने पार पडले.आता सकाळी10 वाजेपासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. ही निवडणूक राजकीय पक्षांच्या आघाड्या, जागा वाटप आणि स्थानिक मुद्द्यांभोवती फिरली, ज्यात महायुती आणि इतर आघाड्यांमध्ये तीव्र स्पर्धा झाली. कोल्हापूरात 66.54 टक्के मतदान झाले होते. गेल्या वेळी कोल्हापूरात 68.85 टक्के मतदान झाले होते.
advertisement
कोल्हापूर महानगरपालिकेत एकूण 81 जागा आहेत, ज्या 31 प्रभागांमध्ये विभागल्या आहेत. ही निवडणूक 2015 नंतरची पहिली मोठी सार्वत्रिक निवडणूक असून, गेल्या निवडणुकीत (2015) काँग्रेसला 32, राष्ट्रवादीला 12, भाजप-ताराराणी आघाडीला 33 जागा मिळाल्या होत्या; शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या पाठिंब्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेत राहिली. यावेळी निवडणूक आयोगाने 2026 मध्ये ही निवडणूक जाहीर केली, ज्यामुळे स्थानिक राजकारणात नवीन चित्र रंगले.
advertisement
कोल्हापूर महानगरपालिका निकालाचे Live अपडेट (Kolhapur Municipal Corporation Election Live Update)
-काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले शारंगधर देशमुख प्रभाग क्रमांक नऊ मधून विजयी, या मतदार संघात दोन्हीही पक्षांनी ताकद लावली होती
- प्रभाग क्रमांक १० मधून अर्चना कोराने, अजय इंगवले यांचा विजय
advertisement
-कोल्हापूरातील ताजा कल; काँग्रेस २१, उबाठा २, भाजप १८, शिवसेना ७, राष्ट्रवादी ३ जागांवर आघाडीवर
-कसबा बावड्यात सतेज पाटील यांनी गड राखला, प्रभाग क्रमांक एक मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी; सुभाष बुचडे, पुष्पा नरुटे, रूपाली पोवार, सचिन चौगुले यांचा विजय
advertisement
-प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजय
-प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते, विजेंद्र माने विजयी
-शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मेहुण्याची बायको वंदना मोहिते विजयी
-शिवसेनेचे नेते नाना कदम यांच्या चुलत बहीण राजनंदा महाडीक याना विजयी फुलाला
advertisement
-कोल्हापूरात काँग्रेसची आघाडी- काँग्रेस १७, भाजप १५, शिवसेना ७, राष्ट्रवादी ३, उबाठा २ जागांवर आघाडीवर
-सतेज पाटील यांचा बालेकिल्ला प्रभाग क्रमांक एक मध्ये काँग्रेसचे सुभाष बुचडे आघाडीवर
- प्रभाग ९ मधून राहूल माने आघाडीवर, शिवसेनेचे शारंगधर देशमुख पिछाडीवर, निवडणुकीआधी सतेज पाटलांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.
advertisement
- प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपच्या राजनंदा महाडिक, शिवसेनेच्या वंदना मोहिते आघाडीवर
- कोल्हापूरचा पहिला निकाल साडेआकरापर्यंत हाती येण्याची शक्यता
-कोल्हापुरमध्ये सुरुवातीचे कल हाती- भाजप १० जागांवर, शिवसेना ६, राष्ट्रवादी ३, काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर
मुख्य मुद्दे
मतदारांनी मोहल्ल्यांत पाणी पुरवठा, रस्ते, गटारी, कचरा व्यवस्थापनासारखे मूलभूत मुद्दे उपेक्षित असल्याचा आरोप केला. प्रचारात राजकीय नेत्यांच्या प्रभाव, भावकी-गावकीचा वाटा आणि विकासकामांचा उल्लेख प्रमुख होता, पण मतदार उत्साहाने मूलभूत समस्या हाताळण्याच्या अपेक्षेने मतदान केले.
महत्त्वाच्या लढती
44 माजी नगरसेवकांनी पुन्हा रिंगण लावले, ज्यात 20 प्रभागांत थेट चढाई पहायला मिळाली. काँग्रेसकडून राजेश लाटकर, इंद्रजित बोंडरे, संजय मोहिते यांसारखे प्रमुख उमेदवार; महायुतीत हसन मुश्रीफसारख्या नेत्यांचे पॅनल. काही प्रभागांत पाटील (22) आणि पवार (10) आडनावांच्या उमेदवारांमुळे कुटुंब-प्रतिष्ठेची लढत रंगली.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur Election Live Update: कोल्हापुरात सतेज पाटील यांना धक्का, प्रभाग क्रमांक 9चा निकाल जाहीर; काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले शारंगधर देशमुख विजयी
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement