राज्य सरकारकडून मागील वर्षी अंत्योदय शिधापत्रिकेत नाव असलेल्या एका महिलेस साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार, यंदा होळी सणाच्या पूर्वीच साडी वाटप सुरू करण्यात आलेले आहे. जालना पुरवठा विभागासाठी 25 हजार 104 साड्या प्राप्त झालेल्या आहेत. 2028 या वर्षापर्यंत दरवर्षी एक साडी मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने हातमाग मंडळाशी करार केला आहे.
advertisement
Gold Rate Hike: सोन्या-चांदीने सगळेच विक्रम तोडले, आज 24 कॅरेटला किती रुपये मोजावे लागणार?
जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यांसाठी अद्याप साड्या उपलब्ध झालेल्या नाहीत. अंबड, घनसावंगी आणि भोकरदन तालुक्यासाठी साड्या उपलब्ध झालेल्या नसल्याचे दिसून येत आहे. या तीन तालुक्यांतील 18 हजार 214 लाभार्थ्यांना अद्याप वाटप होऊ शकलेले नाही. मागील वर्षी झालेल्या शासनाने साडी वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु, वाटपाची प्रक्रिया सुरू असतानाच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे वाटप थांबविण्यात आले होते. शिल्लक राहिलेले वाटप निवडणुकीनंतर करण्यात आले.
दरम्यान, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी 25 हजार 104 साड्या उपलब्ध झालेल्या आहेत. यानुसार, जिल्ह्यातील आठपैकी पाच तालुक्यांत साडी वाटप सुरू करण्यात आलेली आहे. त्यात बदनापूर, जालना, जाफराबाद, परतूर आणि मंठा या तालुक्यात साडी प्राप्त झाल्या असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आलेली आहे.






