TRENDING:

बोटिंग, फूड कोर्ट अन् बरंच काही, मूर्ती विसर्जनासाठी जालन्यात साकारतेय 11 कोटींचे विसर्जन कुंड, Video

Last Updated:

गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सवा दरम्यान मूर्ती विसर्जन केल्यानंतर होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी जालना महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. तब्बल 11 कोटी रुपये खर्च करून विसर्जन कुंडाची निर्मिती मनपा कडून करण्यात येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी 
advertisement

जालना : गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सवा दरम्यान मूर्ती विसर्जन केल्यानंतर होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी जालना महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. तब्बल 11 कोटी रुपये खर्च करून विसर्जन कुंडाची निर्मिती मनपाकडून करण्यात येत आहे. मोती तलावात मोठ्या प्रमाणावर मूर्ती विसर्जन होत असल्याने तलावाच्या तळाला पीओपीचा मोठा थर जमा झाला आहे. यामुळे मोती तलाव यामधून पाण्याचे पाझरणे पूर्णपणे बंद झाले आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता मनपाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. याचे नागरिकांबरोबरच पर्यावरणासाठी देखील अनेक फायदे होणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पाची माहिती लोकल 18 च्या प्रतिनिधीने मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडून जाणून घेतली पाहुयात.

advertisement

मराठवाडा हा पाण्याचे दुर्भिक्ष असलेला प्रदेश आहे. शहरातील नागरिकांना देखील पाण्यासाठी सात ते आठ दिवस वाट पहावी लागते. जालना शहरातील मुक्तेश्वर आणि मोती तलावात पाणी असून देखील या पाण्याचा पाणीपुरवठा शहरवासियांना करता येत नाही. त्याचं कारण म्हणजे या दोन्ही तलावांमध्ये उत्सवान दरम्यान मूर्ती विसर्जन होत असल्याने पाण्यातून झालेले प्रदूषण हे टाळण्यासाठी महानगरपालिकेने विसर्जन कुंड तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे संपूर्ण तलाव प्रदूषित होण्यापासून वाचणार आहे.

advertisement

Maghi Ganesh Utsav: आता मुंबईतच होणार इच्छापूर्ती! इथं आहे महाकुंभ मेळ्याची प्रतिकृती!

तब्बल 110 मीटर लांब 65 मीटर रुंद आणि सहा मीटर खोली असलेला हा विसर्जन कुंड असणार आहे. त्याच्या बाजूला विस्तीर्ण असा घाट असेल. हा घाट पूर्णपणे विकसित करण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी रेन डान्स करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या विसर्जन कुंडाजवळच फूड पार्क तयार करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात बोटिंगचाही पर्याय मनपा नागरिकांसाठी खुला करणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 11 कोटी रुपये खर्च येणारच एप्रिल अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

या प्रकल्पामुळे तलावाचे संवर्धन होईल, मोती तलावामध्ये असलेली जैवविविधता कायम राहील, तलावात असलेल्या वनस्पती आणि यावर उपजीविका करणारे प्राणी यांनाही यामुळे पूरक वातावरण तयार होईल. त्याचबरोबर तलावाची पाझरण क्षमता वाढेल. त्यामुळे शहरातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल तसेच पाण्याचे प्रदूषण टाळेल व मूर्ती विसर्जनासाठी चांगली सोय शहर वासियांना उपलब्ध होईल, असे मनपा आयुक्तांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
बोटिंग, फूड कोर्ट अन् बरंच काही, मूर्ती विसर्जनासाठी जालन्यात साकारतेय 11 कोटींचे विसर्जन कुंड, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल