जालना शहरापासून काही अंतरावर अंबड रोडच्या बाजूला सामनगाव रोडवर ही म्हसोबा वनराई टेकडी आहे. या टेकडी तसेच परिसरात 2024 मध्ये ग्रीन व्हीजन क्लबने वृक्षारोपण करण्याचा मानस केला. सर्व सदस्यांकडून याला दुजोरा मिळाल्यानंतर सामनगाव ग्रामपंचायतकडून परवानगी मिळवली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून टेकडी तसेच परिसरात वृक्ष लागवड सुरू केली. जास्तीत जास्त देशी वृक्ष लागवडीवर या समूहाने भर दिला. आतापर्यंत जालना शहरातील विविध भागात 1000 झाडांचे रोपण आणि संवर्धन केले आहे.
advertisement
हमाल दे धमाल! रेल्वे स्टेशनवर ओझी उचलतोय फेमस बॉडी बिल्डर, कामगिरी पाहाल तर चकीत व्हाल!
रामेश्वर हिवाळे हे स्थळ निश्चिती करून खड्डे खोदून वृक्ष लागवड करतात. श्रीराम देवगुंडे आर्थिक व्यवहार ज्यात खत, औषधी, वृक्षांची खरेदी करतात. विपुल धोत्रे हे उन्हाळ्यात वृक्ष जोपासण्याचे काम करतात. अमोल गायकवाड हे विविध कार्यालय, शाळा यांच्याशी संपर्क ठेवून वृक्षारोपणाचे नियोजन करतात. दीपक चव्हाण पशू-पक्षी यांच्या संवर्धनासाठी बियाणे संकलन करतात. राजेश गवई आणि संतोष चव्हाण हे दोघे जण वर्षभरात लागणाऱ्या वृक्षांचे रोपण आणि पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडतात.
टेकडीला हिरवीगार करण्याचा मानस
म्हसोबा वनराई टेकडी हिरवीगार करणे हा या ग्रीन व्हीजन क्लबचा मुख्य उद्देश आहे. भविष्यात या समूहाचे व्यापक लोकचळवळीत रूपांतर करण्याचा आमचा मानस आहे. आम्हाला वनराई टेकडीवर सुमारे आठशे वृक्ष संवर्धन करण्यात यश आले आहे. या समूहाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांत वृक्ष संवर्धन, रोपण तसेच पशू-पक्षी संवर्धन, पर्यावरणाबद्दल जागरूकता करणे या उद्देशाने कार्य करायचे नियोजित असल्याचे अमोल गायकवाड यांनी सांगितले.





