जालना : मराठवाड्यात मागील 2 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये होत असलेल्या धुवाधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. यामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. या पाणीसाठ्यामुळे आता जायकवाडी धरण 87 टक्के भरले आहे.
जायकवाडी धरणामधून कधीही पाण्याचा विसर्ग सोडला जाऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या गावांना पैठण पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. याबाबतच्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा.
advertisement
जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस सुरू आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढणार आहे. उपरोक्त पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणाकडे येणारी आवक विचारात घेऊन यापुढे कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणामधुन गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल.
मुंबईत ढोल पथकाच्या टीमचं कौतुकास्पद कार्य, पथनाट्याच्या माध्यमातून करताय जनजागृती, काय आहे विषय?
तसेच जायकवाडी धरणाच्या निम्न बाजुचे आपेगाव, जुने कवसान, चनकवाडी, वडवळी नायगाव, मायगाव, नवगाव तुळजापूर, कुरनपिंपरी या गावातील लोकांनी तसेच पैठण पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांनी सतर्क राहून खबरदारी येण्याचे आवाहन पोलीस निरीक्षकांनी केले आहे.
Diksha Kapoor Success Story : एकाच वेळी मिळवल्या 6 सरकारी नोकऱ्या, कोण आहे ही तरुणी?, Photos
जायकवाडी धरण व गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांच्या निम्न बाजुचे गोदावरी नदी किनाऱ्यालगतच्या गावातील नागरिक, पशुधन, रस्ते, पुल, ई वास्तु यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी केले आहे.