TRENDING:

तेलंगाणामधील रगडी चहा तरुण विकतोय जालन्यात, दिवसाला 5 हजारांची कमाई

Last Updated:

दूध आटवून बनवलेल्या अस्सल रगडीची चहा आणि कॉफीचा आस्वाद घ्यायचा असेल तर जुना जालना शहरातील जिंदल कॅपिटलपाशी असलेल्या अण्णा रगडी आणि चहा स्टॉलला तुम्ही भेट देऊ शकता. इथे 15 रुपयांमध्ये रगडी कॉफी तर 10 रुपयांमध्ये दगडी चहा मिळतोय. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी 
advertisement

जालना : आपल्यापैकी अनेक जण चहा आणि कॉफीचे अस्सल चहाते असतात. तुम्ही देखील चहा किंवा कॉफीचे शौकीन असाल तर जालन्यामध्ये रगडी चहा आणि कॉफी मिळतीये. दूध आटवून बनवलेल्या अस्सल रगडीची चहा आणि कॉफीचा आस्वाद घ्यायचा असेल तर जुना जालना शहरातील जिंदल कॅपिटलपाशी असलेल्या अण्णा रगडी आणि चहा स्टॉलला तुम्ही भेट देऊ शकता. इथे 15 रुपयांमध्ये रगडी कॉफी तर 10 रुपयांमध्ये दगडी चहा मिळतोय.

advertisement

जालना शहरातील मंमादेवी परिसरामध्ये राहणारा ओंकार अडियाल हा रगडी चहा आणि कॉफीचा व्यवसाय करतोय. तेलंगाणा राज्यातील कामा रेड्डी या त्याच्या मामाच्या गावी गेल्यानंतर त्याने रगडी चहाचा आस्वाद घेतला आणि त्याला या चहाची चव अतिशय आवडली. यानंतर महाराष्ट्रात देखील रगडी चहा ही संकल्पना रुजावी म्हणून पाच महिन्यांपूर्वी त्याने रगडीच्या चहा आणि कॉफीचा स्टॉल सुरू केला. या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत असून सकाळ आणि संध्याकाळ जालनाकरांची इथे मोठी गर्दी असते. दररोज 500 ते 600 कप चहा कॉफी या दुकानावर विक्री होत आहे. 10 हजार रुपयांची आर्थिक उलाढाल होऊन दररोज साडेचार ते 5 हजार रुपयांचा निव्वळ नफा ओंकार कमवतोय.

advertisement

तोंडाची चव गेलीय?, मग खा चटपटीत आणि हेल्दी वरणफळ, रेसिपीही अगदी सोपी,VIDEO

काय आहे रगडी चहा ही संकल्पना?

या चहा कॉफीचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी वापरण्यात येणारी रगडी 50 लिटर दूध आटवून आणि त्यामध्ये मसाले घालून तीस लिटर रगडी तयार होते. त्यानंतर या रगडीमध्ये रेगुलर आपण ज्या पद्धतीने चहा आणि कॉफी करतो त्याच पद्धतीने चहा आणि कॉफी तयार केली जाते. घट्ट रगडीमुळे चहा आणि कॉफीला विशेष अशी चव येत असल्याने जालना शहरातील नागरिकांच्या पसंतीस रगडी चहा आणि कॉफी उतरत आहे.

advertisement

फक्त 30 हजारांत सुरू केला व्यवसाय, 20 वर्षीय तरुण करतोय लाखोंची उलाढाल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात शरीराला फायदेशीर, बनवा खास बडीशोपचे सरबत, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

मी माझ्या मामाच्या गावी कामा रेड्डी इथे गेलो असतो. तिकडे रगडी चहा प्यायलो. तिकडची चव मला खूप आवडल्याने जालन्यात देखील हा चहा मिळावा असं मला वाटल. नंतर मी पाच महिन्यांपूर्वी जालन्यात हा व्यवसाय सुरू केला. जालनेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज साडेनऊ ते 10 हजारांची आर्थिक उलाढाल होत आहे. यातून साडेचार ते 5 हजारांचा निव्वळ नफा मिळत असल्याचं ओंकार अडियाल यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
तेलंगाणामधील रगडी चहा तरुण विकतोय जालन्यात, दिवसाला 5 हजारांची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल