तोंडाची चव गेलीय?, मग खा चटपटीत आणि हेल्दी वरणफळ, रेसिपीही अगदी सोपी,VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
विदर्भातील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे वरनफळ. हेल्दी आणि चटपटीत वरनफळ कसे बनवायचे ते आपण जाणून घेऊयात. अमरावती येथील गृहिणी दर्शना पापडकर यांनी याबाबत माहिती दिली.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : सध्या पावसाळा सुरू आहे आणि आजारी व्यक्तींची संख्या खूप वाढली आहे. आजारी पडल्यानंतर तोंडाची चव बदलते आणि डॉक्टरही हलके आणि हेल्दी अन्न सेवन करण्याचा सल्ला देतात. असाच एक विदर्भातील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे वरनफळ. हेल्दी आणि चटपटीत वरनफळ कसे बनवायचे ते आपण जाणून घेऊयात. अमरावती येथील गृहिणी दर्शना पापडकर यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
साहित्य :
1. 1 वाटी तुर डाळ (शिजवलेली)
2. 1 वाटी गव्हाचे पीठ
3. टोमॅटो
4. कांदा
5. कोथिंबीर
6. कडीपत्ता
7. हिरवी मिरची
8. जिरे, मोहरी
9. लाल तिखट
10. हळद, धनिया पावडर
कृती : कढईमध्ये तेल घालून गरम होऊ द्यावे. त्यानंतर त्यात जिरे, मोहरी, हिरवी मिरची आणि कांदा घालावेत. कांदा थोडा लालसर होऊ द्यावे. त्यानंतर त्यात मसाले घालावे. मसाले थोडे परतवून घ्यावेत. लगेच त्यात टोमॅटो आणि कोथिंबीर घालावी. फोडणी मऊ होईपर्यंत गव्हाचे पीठ मळून घ्यावे. पीठ मळताना त्यात तेल आणि मीठ घालावे. मळून झाल्यानंतर झाकून ठेवावे.
advertisement
ना तेल ना मसाला, चवीसह आरोग्यसाठीही फायदेशीर, अगदी पटकन तयार होतं हे लोणचं कोणतं?
तोपर्यंत फोडणी मऊ होईल. नंतर त्यात शिजवलेली तूर डाळ घालावी आणि परतवून घ्यावी. त्यात तुम्हाला हवे तेवढे प्रमाणात पाणी घालावे. त्याला 1 उकळी येऊ द्यावी. तोपर्यंत मळलेल्या पिठाची पोळी करून त्याचे काप करून घ्यावे. दुसरीकडे वरणाला उकळी आली असेल. त्यात ते केलेले काप घालावे आणि त्यालाही 1 उकळी काढून घ्यावी. तुमचे वरणफळ तयार झालेले असेल.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
September 06, 2024 4:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
तोंडाची चव गेलीय?, मग खा चटपटीत आणि हेल्दी वरणफळ, रेसिपीही अगदी सोपी,VIDEO