अद्भुत! डोळ्यावर पट्टी बांधून फक्त 25 सेकंदात काढतो बाप्पाचे चित्र, अनोख्या भक्ताची अनोखी कामगिरी

Last Updated:

विजय यांनी आतापर्यंत गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने 2 विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डशिवाय आणखी एक विश्वविक्रमही त्यांनी केला आहे.

कलाकार विजय
कलाकार विजय
अभिषेक जैस्वाल, प्रतिनिधी
वाराणसी : बाबा विश्वनाथची नगरी वाराणसीमध्ये त्याचे पुत्र गणपती बाप्पाचे सर्वात अनोखे भक्त राहतात. हे भक्त इतके अनोखे आहेत की, ते फक्त 25 सेकंदात डोळे बंद करुन बाप्पाचे चित्र तयार करतात. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी ते वेगळे चित्र साकारतात. विजय असे या भक्ताचे नाव आहे. विजय यांनी आतापर्यंत लाखो चित्र साकारली आहेत. तसेच वेळोवेळी या चित्रांचे प्रदर्शनही ते लावतात. जाणून घेऊयात, बाप्पाच्या या अनोख्या भक्ताची कहाणी.
advertisement
विजय हे बालपणापासूनच गणपती बाप्पाचे भक्त आहेत. ते वाराणसीच्या अस्सी परिसरात राहतात. त्यांच्या भक्तीमध्ये लीन होऊन ते डोळ्यावर पट्टी बांधून कॅन्व्हॉसवर अगदी पटकन चित्र तयार करतात. चित्र तयार करण्याआधी ते भगवान गणपतीचे ध्यान करतात आणि मग ॐ गणपते नमः या मंत्राचा जाप करत बाप्पाचे चित्र काढतात.
advertisement
फक्त 25 सेकंदात तयार होते चित्र -
विजय यांच्या या अद्भुत अशा कलाकारीला जो कुणी पाहतो, तो आश्चर्यचकित होतो. आपल्या या कामगिरीबाबत विजय यांनी सांगितले की, ते आधी डोळे बंद न करता चित्र तयार करायचे. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांच्या पुतण्याने त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि मग त्यांना गणपती बाप्पाचे चित्र तयार करायला सांगितले होते. यानंतर विजय यांनी याचा सराव सुरू केला आणि आता ते फक्त 25 ते 30 सेकंदात डोळे बंद करुन गणपती बाप्पाचे चित्र तयार करुन देतात.
advertisement
आतापर्यंत बनवले 2 विक्रम -
advertisement
विजय यांनी आतापर्यंत गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने 2 विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डशिवाय आणखी एक विश्वविक्रमही त्यांनी केला आहे. आता तिसरा विश्वविक्रम करण्याच्या तयारीत व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले.
विजय यांची अद्भुत कलेला पाहायला आलेले जय शंकर यांनी सांगितले की, त्यांच्यावर स्वत: गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. त्यामुळेच विजय हे डोळे बंद करुन इतके सुंदर असे चित्र काढतात.
view comments
मराठी बातम्या/देश/
अद्भुत! डोळ्यावर पट्टी बांधून फक्त 25 सेकंदात काढतो बाप्पाचे चित्र, अनोख्या भक्ताची अनोखी कामगिरी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement