जालना शहरात राहणारे बालाजी तळेकर हे 2005 पासून सलून व्यवसायात आहे. श्रावण महिन्या संदर्भात बोलताना तळेकर म्हणाले की, शहरी भागामध्ये अनेक जण ऑफिसेस आणि जॉबला जात असल्याने क्लीन शेव करतात. पण, धार्मिक गोष्टी आणि परंपरेला मानणारे अनेक लोक श्रावण पाळतात. या महिन्यात ते दाढी व कटिंग करत नाहीत. ग्रामीण भागामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के लोक श्रावण पाळतात.
advertisement
Shravan Month : श्रावणात देवदर्शनाला जायचंय? जालन्यातून ST महामंडळाकडून विशेष गाड्या, संपूर्ण यादी
तळेकर यांच्या दुकानामध्ये तीन ते चार कामगार आहेत. दररोज अडीच ते तीन हजार रुपयांचा व्यवसाय होते असे. मात्र, श्रावण सुरू झाल्यापासून दररोज हजार ते बाराशे रुपयांचा व्यवसाय होतो. व्यवसायामध्ये मोठी घट आली आहे, असं सलून व्यावसायिक बालाजी तळेकर यांनी लोकल 18शी बोलताना सांगितलं.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलून व्यवसायावर कोरोना काळापासून फारच परिणाम झाला आहे. 2005 ते 2019 या काळात त्यांचा सलून व्यवसाय अत्यंत चांगल्या स्थितीत होता. पण, कोरोना महामारी आल्यानंतर व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. कोरोनापासून अनेक जण घरीच दाढी कटिंग करत आहेत.