सुविधा आणि नियमांचे नियोजन
वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वन विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पर्यटकांनी अंधारी-कोळघर-सह्याद्रीनगरमार्गे मेढा-सातारा किंवा घाटाईमार्गे सातारा अशा एकेरी वाहतुकीच्या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची, पार्किंगची आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा फुलोत्सवासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या वाहतुकीसाठी बैलगाड्या आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जाणार आहे.
advertisement
ऑनलाइन बुकिंग आवश्यक
या वर्षी ऑनलाइन बुकिंग करूनच येणाऱ्या पर्यटकांना सुट्ट्यांच्या दिवशी प्रवेश दिला जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी एका दिवसात केवळ 3 हजार लोकांनाच प्रवेश मिळेल. त्यांना सकाळी 7 ते 11, 11 ते 3 आणि 3 ते 6 या तीन टप्प्यांमध्ये पठारावर सोडले जाईल.
बुकिंगसाठी www.kas.ind.in या वेबसाइटला भेट द्या. प्रतिव्यक्ती 150 रुपये शुल्क असून, गाईडसाठी 200 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर किंवा फुलांची नासधूस करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही वन विभागाने दिला आहे.
या दुर्मिळ फुलांचा घेता येणार अनुभव
कास पठार सध्या फुलांच्या विविध रंगांनी बहरले आहे. या पठारावर सध्या टूथब्रश, दीपकांडी, चवर, पंद, अभाळी, भुईकारवी, सोनकी, तेरडा, गेंद, सीतेची आसवे, कुमुदिनी यांसारख्या फुलांची आकर्षक फुले फुलली आहेत. ही फुले पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. यामुळे सध्या अनेक पर्यटक कासला भेट देऊन या निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद घेत आहेत.
हे ही वाचा : आज अनंत चतुर्दशी! बाप्पा जाता जाता या 4 राशीचं नशीब उजाडून जाणार, निरोगी आयुष्यासह धनलाभ होणार
हे ही वाचा : भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! उद्या चंद्रग्रहण, रात्रीही दर्शनासाठी खुले राहणार अंबाबाई मंदिर, पण...