भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! उद्या चंद्रग्रहण, रात्रीही दर्शनासाठी खुले राहणार अंबाबाई मंदिर, पण...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur News : उद्या, रविवारी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणामुळे कोल्हापूरची कुलस्वामिनी श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या दैनंदिन कामकाजात बदल करण्यात आला आहे...
Kolhapur News : उद्या, रविवारी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणामुळे कोल्हापूरची कुलस्वामिनी श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या दैनंदिन कामकाजात बदल करण्यात आला आहे. ग्रहणाच्या काळात भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असले, तरी काही पारंपरिक विधी आणि वेळेत बदल करण्यात आला आहे.
वेळापत्रकात काय बदल झाले?
उद्या, रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून ग्रहणाचा वेध सुरू होईल. रात्री 9 वाजून 56 मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श होणार असून, मध्यरात्री 1 वाजून 26 मिनिटांनी ग्रहण संपेल. हा एकूण पर्वकाळ 3 तास 30 मिनिटांचा असेल.
यामुळे नेहमी रात्री होणारी देवीची शेजारती उद्या होणार नाही. ग्रहणादरम्यान मंदिर दर्शनासाठी खुले राहील. ग्रहण संपल्यानंतर देवीला स्नान घालून, पूजा करण्यात येईल आणि त्यानंतरच शेजारती केली जाईल. त्यानंतरच मंदिर बंद होईल. सोमवारपासून मात्र नेहमीच्या वेळेनुसार पहाटे मंदिर उघडून सर्व धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू होतील, ही माहिती श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाने दिली आहे.
advertisement
हे ही वाचा : Chandra Grahan 2025: या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहण पाहू नये; अघटित घडण्याची भीती, संकट ओढावेल
हे ही वाचा : Aajache Rashibhavishya: बाप्पांची कृपा होणार, तुमचं नशीब पालटणार, अनंत चतुर्दशीला ती चूक नको! आजचं राशीभविष्य
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 7:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! उद्या चंद्रग्रहण, रात्रीही दर्शनासाठी खुले राहणार अंबाबाई मंदिर, पण...


