कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील काही लक्षवेधी लढतींपैकी प्रभाग क्रमांक 29 मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप उमेदवारांमध्ये निवडणूक होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष असेल. विशेष म्हणजे युती झालेली असतानाही उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
दरम्यान रविवारी डोंबिवलीतील आयरे गावात भाजपचे माजी नगरसेवक आणि आताचे उमेदवार मंदार टावरे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्या हस्ते झाले. यावेळी टावरे यांनी शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेच्या उमेदवारांवर घराणेशाहीचा आरोप केला. तर भाजप जिल्हाध्यक्ष यांनी थेट पॅनलमध्ये अंबरनाथ पॅटन चालणार असे सांगितले.
advertisement
अंबरनाथ पॅटर्न काय होता?
शिवसेना शिंदे गटाचे अरविंद वाळेकर यांचे प्रस्थ असतानाही यावेळी भाजपने आपले उमेदवार उभे करून अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिंदेसेनेला दणका दिला. वाळेकर यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. अंबरनाथ महापालिकेत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. इथे डोंबिवलीतही घराणेशाहीला चपराक देऊन प्रभाग 29 मध्ये भाजपचे कमळ चालवा, असे नंदू परब म्हणाले.
