उल्हासनगर, अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदे यांनी सत्तेच्या समीकरणांची जुळवाजुळव करून आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. त्यापाठोपाठ आता कल्याण डोंबिवलीतही मनसेच्या नगरेसवकांचा पाठिंबा मिळविण्यात श्रीकांत शिंदे यशस्वी झाले आहेत. कल्याण डोंबिवलीतील बदलत्या समीकरणांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना मोठा दणका बसल्याची चर्चा आहे.
मनसे नगरसेवकांनी शिवसेनेचे हात बळकट केले
कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हॅट्रिक केली. अंबरनाथ, उल्हासनगरनंतर आता कल्याण डोंबिवलीत शिंदेसेना सत्ता स्थापन करणार आहे. मनसेचे नगरसेवक सोबत आल्याने शिवसेनेचे हात बळकट झाले आहेत. शिंदेसेनेचे ५३ नगरसेवक आहेत, त्यांना मनसेच्या ५ नगरसेवकांनी साथ दिली आहे. भविष्यातील घोडेबाजार रोखण्यासाठी आणि स्थिर सत्ता येण्यासाठी निर्णय घेतल्याचे मनसेने सांगितले.
advertisement
कल्याण डोंबिवली शिवशक्ती आघाडी, सोबत जाण्याचे कारण काय? राजू पाटील म्हणाले...
मनसे-शिंदेसेनेने एकत्र येऊन कल्याण डोंबिवली शिवशक्ती आघाडी स्थापन केली आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, असे राज ठाकरे यांचे आदेश होते. त्यानुसार आम्ही कल्याण डोंबिवलीत शिवशक्ती आघाडी स्थापन केली आहे. सत्तेत असल्यानंतर कामे होतात. बाहेर राहून जनतेची कामे झाली नसती. काही वेळा स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावे लागतात, असे मनसेचे माजी आमदार राजू पाटील म्हणाले.
