मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने रॅपिडो बाईक बूक केली होती. प्रवास सुरू असताना, कल्याण पश्चिमेकडील सिंधी गेट परिसरात आरोपी चालकाने बाईक आडबाजूला घेऊन जात तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. चालकाच्या या विकृत कृत्यामुळे तरुणी पुरती हादरली.
मात्र, त्या भयावह परिस्थितीतही तरुणीने धाडस दाखवलं. तिने स्वतःची सुटका करण्यासाठी क्षणाचाही विलंब न लावता आरोपी चालकाचा प्रतिकार केला आणि त्याला चांगलाच चोप दिला. तरुणीच्या आरडाओरड आणि प्रतिकारामुळे घटनास्थळी काही नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. तरुणीच्या धाडसामुळे आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक मोठी घटना टळली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून रॅपिडो चालकाला तरुणी मारहाण करत असताना दिसत आहे.
advertisement
आजुबाजुला काही लोकही जमले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे. मात्र एका रॅपिडो चालकाकडून अशाप्रकारे अतिप्रसंग करण्याचा प्रकार झाल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
