सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात नव्या घडामोडी वेगाने घडल्या आहेत. कणकवली नगरपंचायत निवडणूक अनपेक्षित वळण घेतले आहे. शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना शिंदे गटाच्या शिवसेनेने जाहीर पाठिंबा देताच स्थानिक राजकारणात खळबळ उडाली होती. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या राजकीय प्रभावाला थोपवण्यासाठी विविध पक्ष आणि स्थानिक नेते एकाच मंचावर आले. या निवडणुकीत ‘राणे विरुद्ध राणे’ असाही सामना रंगला होता.
advertisement
कणकवली नगर परिषदेत एकूण १७ जागा आहेत. या १७ जागांपैकी भाजपने ९ जागांवर विजय मिळवला. तर, शहर विकास आघाडीला ८ जागांवर विजय मिळाला. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठीदेखील भाजप आणि शहर विकास आघाडीत चुरशीची लढत झाली.
नितेश राणेंना धक्का....
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि शहर विकास आघाडीचे प्रमुख उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपचे समीर नलावडे यांचा पराभव केला. नगराध्यक्षपदासाठी अखेरच्या फेरीपर्यंत चुरस रंगली होती. अखेर पारकर यांनी नलावडे यांचा अवघ्या १५० मतांनी पराभव केला. हा पराभव म्हणजे भाजप नेते आणि पालक मंत्री नितेश राणे यांना धक्का आहे.
