कराडला नगरपालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.
कराडला प्रमुख तीन उमेदवारांसह नऊ जण निवडणुकीच्या रिंगणात आहे. शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आघाडीचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली. बंद दाराआड झालेल्या या चर्चेत काँग्रेसची समजूत घालण्यात अपयश आले आहे.
advertisement
अर्ज मागे घेण्याअगोदर दोन तास ड्रामा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीनंतरही काँग्रेस नगराध्यक्षा पदाचे उमेदवार झाकीर पठाण निवडणूक रिंगणात कायम आहे. शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार एकत्र, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत कराडमध्ये पाहायला मिळाली आहे. भाजपचे विनायक पावसकर, काँग्रेस झाकीर पठाण, लोकशाही आणि यशवंत आघाडीचे राजेंद्रसिंह यादव यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. एवढच नाही तर शेवटच्या काही वेळ काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठाण यांनी मोबाईल देखील स्विच ऑफ ठेवल्याची माहिती आहे. तसेच अपक्ष असे मिळून 17 उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे नगराध्यदासाठी मोठी चढाओढ होणार आहे. अर्ज मागे घेण्याअगोदर झालेल्या दोन तासांच्या ड्रामामुळे लक्ष वेधले आहे.
प्रचाराला कोण कोण येणार?
कराड नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावर आणि काँग्रेसच्या चिन्हावर लढविण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक येणार आहे. कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने भरण्यात आलेले नगराध्यक्ष व नगरसेवकपदांचे अर्ज वैध ठरले आहेत. या निवडणुकीत स्थानिक विकासाच्या मुद्यांवर प्रचार करून निवडणूक लढवणार असून प्रचाराकरता कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम, चंद्रकांत हंडोरे आदी मान्यवर येणार आहेत.
हे ही वाचा :
