धुळ्यात भाजपचा ऐतिहासिक विजय; मंत्र्याची जादू चालली,अख्ख्या नगरपालिकेवर फुलवलं कमळ
- Published by:Prachi Amale
- Reported by:Deepak Borase
Last Updated:
Dhule News: धुळे जिल्ह्यातल्या नगरपरिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीने इतिहास रचला आहे.
धुळे : धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा नगरपरिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीने इतिहास रचला आहे. नगराध्यक्षपदासह नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व 26 जागा बिनविरोध विजय झाले असून दोंडाई ही राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे.
राज्याचे राज्य शिष्टाचार- पणन मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या दोंडाईचा नगरपालिवरील वरचष्मा कायम राहिला आहे. दोंडाईचा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल या आधीच बिनविरोध विजयी झाल्या होत्या. दरम्यान उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दोंडाईचा नगरपालिकेतील 13 प्रभागातील 26 च्या 26 जागांवरील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भारतीय जनता पार्टीचे सर्व 26 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत.
advertisement
मंत्री जयकुमार रावल काय म्हणाले?
दरम्यान दोंडाईचा नगरपरिषद बिनविरोध झाल्यानंतर त्यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर ताल धरत कार्यकर्त्यांसमवेत विजयाचा जल्लोष केला. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व जागा या बिनविरोध विजयी झाल्याने दोंडाईचा पालिकेने नवा इतिहास रचला आहे. दरम्यान दोंडाईचा नगरपालिकेतील नगराध्यक्षसह सर्व 26 नगरसेवक बिनविरोध निवडून देत दोंडाईकरांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गिफ्ट दिलं असल्याची प्रतिक्रिया मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी दिली.
advertisement
नगराध्यक्ष कसा निवडून आला?
दोंडाईचा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नयन कुवर रावल या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. दोंडाईचा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार शरयू एकनाथ भावसार यांचा उमेदवारी अर्ज अर्ज छाननीच्या प्रक्रियेत घेतलेला हरकतीमुळे बाद झाला. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज राहिल्याने राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल या राज्यातल्या पहिल्या बिनविरोध नगराध्यक्ष ठरल्या आहेत. दोंडाईचा प्रमाणेच संपूर्ण राज्यात भाजपाचा झेंडा फडकलेला दिसेल असा विश्वास एवढी मंत्री जयकुमार यांनी व्यक्त केला.
advertisement
हे ही वाचा :
view commentsLocation :
Dhule,Maharashtra
First Published :
November 21, 2025 5:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धुळे/
धुळ्यात भाजपचा ऐतिहासिक विजय; मंत्र्याची जादू चालली,अख्ख्या नगरपालिकेवर फुलवलं कमळ


