रेल्वे प्रशासनाच्या नियोजनानुसार, 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटीहून सकाळी 9 वाजून 30 मिनिटांपासून ते सकाळी 11 वाजून 14 मिनिटांपर्यंत कर्जतला जाणाऱ्या लोकल नेरळपर्यंत चालतील. कर्जतहून सकाळी 11.19 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल नेरळ येथून सुटतील.
Worli Flyover: वरळीतील वाहतुकीचा ताण कमी होणार! उड्डाणपुलाबाबत मोठी अपडेट
advertisement
22 सप्टेंबर रोजी दुपारी 12.25 ते दुपारी 1.55 वाजेपर्यंत कर्जत ते खोपोलीदरम्यान आणि 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11.20 ते दुपारी 1.50 वाजेपर्यंत नेरळ ते खोपोलीदरम्यान लोकल रद्द असतील. बुधवारी 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11.20 ते दुपारी 1.20 आणि दुपारी 1.20 ते दुपारी 3.20 पर्यंत अप, डाऊन आणि मध्य मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत नेरळ ते खोपोली स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.
18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत घेतल्या जाणाऱ्या ब्लॉक कालावधीत कोइम्बतूर-एलटीटी एक्सप्रेस ही गाडी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 5 मिनिटांपर्यंत लोणावळा येथे थांबवण्यात येईल. चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस आणि चेन्नई-एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस देखील दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनंतर नंतर लोणावळा येथून मार्गस्थ होतील. यावेळेत नेरळ ते खोपोलीदरम्यान लोकल बंद राहतील.