मुस्लिम खाटिक बांधव मोठ्या प्रमाणात जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. अधिकृत बाजारातून ते शेतकरी आणि इतर व्यापाऱ्यांकडून मोठी जनावरे खरेदी करतात आणि हीच जनावरे गाडीत टाकून निघतात, तेव्हा गौरक्षेच्या नावाखाली बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांचे तथाकथित कार्यकर्ते गाडी अडवून चालक, क्लिनर आणि व्यापाऱ्यांना अमानुषपणे मारहाण करतात आणि जनावरे खरेदीचे कागदपत्रे असताना देखील पोलीस त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करतात.
advertisement
अश्या घटना वाढत असताना हा अन्याय का सहन करावा? असा प्रश्न उपस्थित करत मुस्लिम खाटिक बांधवानी जनावरे खरेदी विक्रीवर पूर्णपणे बहिष्कार टाकला असून बुलढाणा जिल्ह्यात देखील या निर्णयावर अंमलबजावणी केली जाणार आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन भविष्यात शेतकरी बांधवांची अडचण समजून योग्य ते निर्णय घ्यावा अशी मागणी देखील मुस्लिम खाटीक बांधवांनी केली आहे.