TRENDING:

Mental Health: तरुणाई जातेय डिप्रेशनच्या विळख्यात; कारणं, परिणाम आणि उपाय काय

Last Updated:

Mental Health: रक्ताच्या आणि व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मेंदूवर ताण येतो, विचारांचा ओघ वाढतो आणि मानसिक थकवा येतो. अशी स्थिती डिप्रेशनचा पाया ठरते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: सध्याची लाइफस्टाइल फारच धकाधकीची आहे. बहुतांशी तरुणांना काम आणि घर अशा दोन्ही ठिकाणच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी स्ट्रगल करावा लागत आहे. सध्याच्या स्पर्धात्मक काळात तग धरून राहण्याच्या प्रक्रियेमध्ये तरुणाई स्ट्रेस आणि डिप्रेशनला बळी पडत आहे. अलीकडच्या काळात तर किरकोळ कारणांमुळेही तरुण मानसिक तणावात जात आहेत. यामागे वैयक्तिक, सामाजिक आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक कारणं असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. लोकल 18ने याबाबत डॉ. प्रकाश सहिंद्रकर यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली.
advertisement

व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार

सध्याच्या तरुण पिढीला व्यायामाची सवय नाही. कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करता ते कामाचा प्रचंड ताण सहन करतात. परिणामी शरीर आणि मन दोन्ही थकलेले असते. याशिवाय फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढल्याने कोलेस्टेरॉल वाढते आणि आवश्यक जीवनसत्त्वांचा (व्हिटॅमिन्स) अभाव निर्माण होतो. रक्ताच्या आणि व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मेंदूवर ताण येतो, विचारांचा ओघ वाढतो आणि मानसिक थकवा येतो. अशी स्थिती डिप्रेशनचा पाया ठरते, अशी माहिती डॉ. सहिंद्रकर यांनी दिली.

advertisement

Reel पाहण्याची नशा फार वाईट, हे वाचून तुम्हाला बसेल शॉक!

View More

यश मिळवण्याची घाई

डॉ. सहिंद्रकर यांच्या मते, आजच्या पिढीमध्ये लवकरात लवकर यश मिळवण्याची मानसिकता वाढली आहे. मोठा बंगला, गाडी, प्रतिष्ठा हे मिळवण्यासाठी वेळ लागतो. या गोष्टींचा जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यावर अनुभव घेणं गरजेचं आहे. वयाच्या 40व्या वर्षी यश आलं तरी ते यशच असतं. पण, सध्याची पिढी असा विचार करत नाही. त्यांना भौतिक सुखाच्या सर्व गोष्टी फार कमी वयात मिळवण्याची इच्छा असते.

advertisement

वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष

करिअरच्या मागे धावताना अनेक जण वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलतात. यामुळे हार्मोन्सच्या पातळीत बदल होतो आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. लग्न, नोकरी, इतर जबाबदाऱ्या या गोष्टी योग्य वयात पार पडल्या पाहिजेत, असंही डॉक्टर म्हणाले.

मानसिक आरोग्यासाठी तीन मंत्र

योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेचं व्यवस्थापन केल्यास मानसिक आरोग्य सुधारू शकतं. सकारात्मक जीवनशैली स्वीकारल्यास डिप्रेशनपासून दूर राहून यशाच्या मार्गावर चालता येईल, असा सल्ला डॉ. प्रकाश सहिंद्रकर यांनी दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mental Health: तरुणाई जातेय डिप्रेशनच्या विळख्यात; कारणं, परिणाम आणि उपाय काय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल