नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा लोकार्पण सोहळा पार पडला असून रेल्वे प्रशासनाने तिकीट बुकिंग सुविधा सुरू केली आहे. प्रवासी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तिकीट बूक करू शकतील.
Vande Bharat: शेगाव भक्तांसाठी खूशखबर, पुणे-नागपूर वंदे भारत संत नगरीत थांबणार
कसे असतील तिकीट दर?
नागपूर ते पुणे: चेअर सीटसाठी 2140 रुपये तर एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 3815 रुपये तिकीट ठेवण्यात आलं आहे.
advertisement
अहिल्यानगर ते पुणे: चेअर सीटसाठी 508 रुपये तर एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 819 रुपये तिकीट आहे. जर प्रवासादरम्यान नाश्ता आणि जेवणाची सुविधा घ्यायची असेल तर चेअर सीटसाठी 750 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 1279 रुपये मोजावे लागतील.
अहिल्यानगर ते नागपूर: चेअर सीटसाठी 1410 रुपये तर एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 2867 रुपये तिकीट आहे. अहिल्यानगर ते नागपूर प्रवासादरम्यान नाश्ता आणि जेवणाची सुविधा घ्यायची असेल तर चेअर सीटसाठी 1735 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 3815 रुपये तिकीट आहे.
वंदे भारत एक्सप्रेसमुळे पुणे-नागपूर दरम्यानचा प्रवास आता अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे. सध्या इतर एक्सप्रेस गाड्यांना या प्रवासासाठी सुमारे 15 तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस केवळ 12 तासांत हे अंतर पार करणार आहे.
ही गाडी नागपूरहून सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. या मार्गावर अजनी (नागपूर), वर्धा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि दौंड कॉर्ड लाईन या प्रमुख स्थानकांवर गाडीचा थांबा असेल.