TRENDING:

11000 वोल्टचा शॉक, क्रिकेटचा बॉल ठरला काळ, कोल्हापुरात 13 वर्षीय मुलाचा मित्रांसमोर तडफडून मृत्यू

Last Updated:

अफान असिफ बागवान या १३ वर्षीय मुलाचा कोल्हापूर उजळाईवाडी येथे उच्चदाब विद्युत वाहिनीच्या धक्क्याने मृत्यू, परिसरात शोककळा पसरली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर: खेळताना घरावर गेलेला चेंडू आणण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा हाय वोल्टेज लाइनच्या संपर्कात आल्याने, विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाला. अफान असिफ बागवान, असं या मृत मुलाचं नाव आहे. या घटनेने अफानच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी हृदयद्रावक घटना घडली, या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. उजळाईवाडी इथे क्रिकेट खेळताना शेजारच्या घरावर गेलेला बॉल आणायला गेलेल्या मुलासोबत भयंकर घडलं.
News18
News18
advertisement

शुक्रवारी शाळेला सुट्टी असल्याने अफान सकाळीच मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. मित्रांसोबतच्या खेळामध्ये तो पूर्णपणे रमला होता. खेळ सुरू असतानाच अचानक चेंडू शेजारील हनुमंत खांडेकर यांच्या इमारतीच्या टेरेसवर गेला. नेहमीप्रमाणेच अफान तो चेंडू परत आणण्यासाठी टेरेसवर गेला. पण त्याला कल्पना नव्हती की, काही क्षणातच तो काळाच्या तोंडी जाणार आहे.

advertisement

टेरेसवर चेंडू आणत असताना, घराच्या अगदी दीड ते दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या ११,००० व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब विद्युत वाहिनीचा त्याला संपर्क झाला. विजेचा धक्का इतका जबरदस्त होता की, अफानचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, अफानला सावरण्याची किंवा त्याला वैद्यकीय मदत मिळण्याचीही संधी मिळाली नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुळाची झाली भाव वाढ, केळी आणि आल्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

ही दुर्घटना ज्या ठिकाणी घडली, त्या इमारतीवरून उच्चदाब वाहिनी गेलेली आहे, जी विमानतळाला वीजपुरवठा करते. तो टेरेसवर गेला असता घराच्या अगदी दीड-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या ११००० व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा त्याला संपर्क होताच जोराचा विद्युत धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या इमारतीवरून विमानतळाला पुरवठा करणारी उच्चदाब वाहिनी जाते. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
11000 वोल्टचा शॉक, क्रिकेटचा बॉल ठरला काळ, कोल्हापुरात 13 वर्षीय मुलाचा मित्रांसमोर तडफडून मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल