देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार रंगलाय तो महाराष्ट्राच्या सांगलीत. यामध्ये जो जिंकेल त्याला 2 फॉर्च्युनर, 2 थार गाड्या, ट्रॅक्टर, बुलेट आणि 150 हून अधिक बाईक अशा पद्धतीनं बक्षीसांचं वाटप केलं जाणार आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. 'श्रीनाथ केसरी' नावाने होणारी ही स्पर्धा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केली आहे.
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या स्पर्धांमध्ये शिवसेनेनं आपली सर्व ताकद पणाला लावत बक्षीसांचा धुरळा उडवलाय. तब्बल अडीच हजार बैलगाडा मालक या शर्यतीत सहभागी झाले आहेत. चंद्रहार पाटलांनी या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. 500 एकर मैदानावर रंगलेल्या या थरारक बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं बैलगाडा शौकीनांनी हजेरी लावलीये. शेकडो बैलगाडा मालक या शर्यतीमध्ये सहभागी झालेत तर शर्यती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडी शौकीन दाखल झालेत.
बैलगाडी शर्यतींच्या इतिहासातले ही सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत पार पडत असतो म्हणजे या ठिकाणी महिला बैलगाडी शर्यतींचा थरार देखील रंगणार आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या बैलगाडी शर्यतीचा मुख्य सोहळा पार पडणार असून बैलगाडी शर्यत संघटनेचे अधिवेशन देखील होणार आहे,फॉर्च्यूनर,थार,ट्रॅक्टर,बुलेट सह 150 दुचाकी अशी कोट्यावधींची बक्षीस अजून सकाळपासून वेगवेगळ्या गटांमध्ये या बैलगाडी शर्यती सुरू आहे..
