TRENDING:

खाऊ आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कोल्हापुरातला संतापजनक प्रकार

Last Updated:

Kolhapur News: खाऊ आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. मुलीने आपल्यावर ओढावलेली आपबीती कुटुंबियांनी सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी, कोल्हापूर : मालेगाव येथील चिमुकलीवर अत्याचार आणि तिचे हत्या प्रकरण ताजे असतानाच कोल्हापुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खाऊ आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केला. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करायला विलंब केल्याने संतापलेल्या कोल्हापूरकरांनी पोलिसांच्या विरोधात मोर्चा काढला.
कोल्हापूर अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरण
कोल्हापूर अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरण
advertisement

खाऊ आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. मुलीने आपल्यावर ओढावलेली आपबीती कुटुंबियांनी सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेता विलंब केला. मात्र नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर पोलिसांनी इचलकरंजीत एकावर गुन्हा दाखल केला.

शहापूर पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्हाला माहितीये का? नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्यातला नेमका फरक; समजून घ्या!
सर्व पहा

पोलिसांनी गुन्हा दाखल करायला विलंब केल्याने नागरिक आक्रमक झाले होते. शहापूर पोलीस ठाण्यावर नागरिकांनी मोर्चा काढला. आमदार राहुल आवडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला होता. पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांचे निलंबन करण्याची मागणी मोर्चातून केली गेली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खाऊ आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कोल्हापुरातला संतापजनक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल