TRENDING:

कोल्हापूर मुंबई हायवेवर 'मनी हाईस्ट', 420 सेकंदात लुटले सव्वा कोटींचे दागिने, खासगी बसवर दरोडा

Last Updated:

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसवर सोमवारी (२२ डिसेंबर) मध्यरात्री भररस्त्यात सशस्त्र दरोडा टाकला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसवर सोमवारी (२२ डिसेंबर) मध्यरात्री भररस्त्यात सशस्त्र दरोडा टाकला आहे. दरोडेखोरांनी बसच्या डिकीतील १ कोटी २० लाख रुपये किमतीची ६० किलो चांदी आणि सोने असा एकूण सव्वा कोटींचा ऐवज लंपास केला आहे. किणी टोलनाक्यापासून काही अंतरावर हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

प्रवाशांच्या वेशात आले होते दरोडेखोर

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांच्या सोन्या-चांदीचे दागिने अंगडिया सर्व्हिसेसद्वारे मुंबईला नेले जातात. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईसाठी 'अशोका ट्रॅव्हल्स'ची बस रवाना झाली. या बसमध्ये दरोडेखोरांचे तीन साथीदार आधीच प्रवासी म्हणून बसले होते. गाडी कोल्हापूर सोडून किणी टोलनाक्याच्या परिसरात पोहोचताच, बसमध्ये बसलेल्या या तिघांपैकी एकाने बस चालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला गाडी थांबवण्यास भाग पाडले.

advertisement

अवघ्या काही मिनिटांत सव्वा कोटींचा ऐवज लंपास

चालकाने बस थांबवताच, दरोडेखोरांच्या पाठीमागून येणारी एक कार तिथे येऊन थांबली. कारमधून उतरलेल्या इतर साथीदारांनी बसच्या डिकीचा ताबा घेतला. डिकीमध्ये असलेली ६० किलो चांदी, एक तोळा सोनं आणि रोख रक्कम असा एकूण सव्वा कोटींचा माल दरोडेखोरांनी अवघ्या काही मिनिटांत कारमध्ये भरला आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाले. हा सगळा प्रकार ५ ते ७ मिनिटांत घडला.

advertisement

रेकी झाल्याचा पोलिसांना संशय

या घटनेनंतर चालकाने तत्काळ ट्रॅव्हल्स मालकाला आणि पेठवडगाव पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरोडेखोर आधीच प्रवासी म्हणून बसमध्ये बसले होते आणि त्यांना डिकीतील मौल्यवान ऐवजाची माहिती होती, यावरून या गुन्ह्यासाठी आधी मोठी रेकी करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

advertisement

पोलिसांकडून तपास सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी गेली, 2 भावांनी सुरू केला अंडा रोल व्यवसाय, महिन्याची उलाढाल आता लाखात
सर्व पहा

दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित कार आणि आरोपींचा शोध घेतला जात आहे. महामार्गावर अशा प्रकारे सशस्त्र दरोडा पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापूर मुंबई हायवेवर 'मनी हाईस्ट', 420 सेकंदात लुटले सव्वा कोटींचे दागिने, खासगी बसवर दरोडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल