रविवारी राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा बंद झाला असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होत आहे. दिवसभरात अर्ध्या फूटाने पाणी पातळी घटली आहे. सध्या 22 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यावरील पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
गगनबावडा तालुक्यासह कुंभी, कोदे, घटप्रभा या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्याला मंगळवार (दि. 2) पासून 3 दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. मागील पावसामुळे घरांची आणि जनावरांच्या गोठ्याची पडझड झालेली आहे.
advertisement
समुद्राच्या तळाशी सुरू असलेल्या मान्सूनच्या द्रोणीय परिस्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. राजस्थानच्या मध्यभागामध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. 2 सप्टेंबर पासून बंगालच्या खाडीवर नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लागणार असल्याचा हवामान विभागाने वर्तवली आहे.
हे ही वाचा : कोल्हापुरात फुललं 'कास पठारा'सारखं सौंदर्य; 'या' सोनेरी-पिवळ्या फुलांनी पर्यटकांचं वेधलं लक्ष!
हे ही वाचा : गॅस सिलिंडरसाठी ई-केवायसी अनिवार्य; माण तालुक्यातील ग्राहकांना भारत गॅस एजन्सीचे आवाहन