गॅस सिलिंडरसाठी ई-केवायसी अनिवार्य; माण तालुक्यातील ग्राहकांना भारत गॅस एजन्सीचे आवाहन

Last Updated:

Satara News : माण तालुका आणि इतर परिसरातील गॅस ग्राहकांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी, अन्यथा सिलिंडर मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे...

Satara News
Satara News
Satara News : माण तालुका आणि इतर परिसरातील गॅस ग्राहकांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी, अन्यथा सिलिंडर मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांनी त्वरित केवायसी करून घ्यावी, असे आवाहन म्हसवड शुभम भारत गॅस एजन्सीतर्फे करण्यात आली आहे.
गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे. ज्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही, त्या ग्राहकांनी त्वरित करून घ्यावी. अन्यथा सिलिंडर मिळवण्यात अडचण येऊ शकते. ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एजन्सीच्या अधिकृत गाडीद्वारे ई-केवायसी करण्याची सोय करण्यात आली आहे. ग्राहकांना म्हसवड येथील मुख्य कार्यालयात येणे बंधनकारक राहणार नाही.
ई-केवायसी करण्यासाठी आधार कार्ड, गॅस पुस्तक, स्वतः व्यक्ती उपस्थित असणे आवश्यक आहे. ग्राहकांनी तातडीने सहकार्य करून ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन शुभम भारत गॅस एजन्सी, म्हसवडतर्फे करण्यात आला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गॅस सिलिंडरसाठी ई-केवायसी अनिवार्य; माण तालुक्यातील ग्राहकांना भारत गॅस एजन्सीचे आवाहन
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement