TRENDING:

Kolhapur Shiv Sena UBT: कोल्हापुरात राडा! ठाकरेंचा नेता काँग्रेसचा स्वीकृत नगरसेवक, शिवसैनिकांकडून घरlवरच धडक, ‘’तुम्ही शिवसेनेला...’’

Last Updated:

Kolhapur News: कोल्हापूर शहरातील शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, त्याचे पर्यावसान राड्यात झाले. शहरप्रमुख सुनील मोदी यांनी शिवसेनेचा घात केला असून ते काँग्रेसचे हस्तक म्हणून काम करत असल्याचा खळबळजनक आरोप करत संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या घरावर धडक दिली.
निवड ठाकरेंच्या शिवसेनेची, पण शिक्का काँग्रेसचा! स्वीकृत नगरसेवक पदावरून शहरप्रमुखांच्या घरावर शिवसैनिकांची धडक!
निवड ठाकरेंच्या शिवसेनेची, पण शिक्का काँग्रेसचा! स्वीकृत नगरसेवक पदावरून शहरप्रमुखांच्या घरावर शिवसैनिकांची धडक!
advertisement

नेमकं कारण काय?

कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शहरप्रमुख सुनील मोदी यांची निवड झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली. परिवहन समितीमध्ये विशाल देवकुळे यांचे नाव डावलण्यात आल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे. निष्ठावान शिवसैनिकांना डावलून मोदींनी स्वतःची सोय लावल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. याच संतापातून देवकुळे यांच्या समर्थकांनी थेट सुनील मोदींच्या निवासस्थानी धाव घेत त्यांना जाब विचारला.

advertisement

"उद्धव ठाकरेंची शिवसेना मोदींनी संपवली!"

यावेळी मोदींच्या घराबाहेर मोठा गोंधळ उडाला. "सुनील मोदी हे पक्षात राहून काँग्रेससाठी काम करत आहेत. त्यांनी कोल्हापुरातून उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे," अशा तीव्र शब्दांत विशाल देवकुळे यांनी आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राजकीय वातावरण तापले

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील खास पदार्थ, सांज्याची पोळी, रेसिपीचा Video
सर्व पहा

एकीकडे विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असतानाच, ठाकरे गटातील हा गटबाजीचा स्फोट पक्षासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. सुनील मोदींनी अद्याप या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या घटनेमुळे कोल्हापुरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur Shiv Sena UBT: कोल्हापुरात राडा! ठाकरेंचा नेता काँग्रेसचा स्वीकृत नगरसेवक, शिवसैनिकांकडून घरlवरच धडक, ‘’तुम्ही शिवसेनेला...’’
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल