सांज्याची पोळी बनवण्यासाठी साहित्य
रवा, गूळ, वेलची, जायफळ, सुंठ पावडर, केशर बदामाचे काप, तूप, गव्हाचे पीठ, तेल आणि चवीनुसार मीठ हे साहित्य लागेल.
शाब्बास पोरी! आई गृहिणी, वडील पेट्रोल पंपावर कामाला, लेकीनं शिवजयंतीला केला वर्ल्ड रेकॉर्ड!
सांज्याची पोळी कृती
सुरुवातीला गव्हाच्या पिठात चिमूटभर मीठ आणि एक चमचा तेल घालून आवश्यकतेनुसार पाणी टाकत मऊ कणिक मळून घ्या. ही कणिक 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावी. दरम्यान, कढईत दीड वाटी पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळू लागल्यानंतर त्यात गूळ घालून तो पूर्णपणे विरघळू द्या. त्यानंतर हळूहळू रवा घालत सतत हलवत राहा, जेणेकरून गाठी होणार नाहीत. त्यात वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर तसेच केशर पाणी घालून मिश्रण एकजीव करा. झाकण ठेवून काही मिनिटे वाफ येऊ द्या.
advertisement
सांजा तयार झाल्यानंतर तो थोडा थंड होऊ द्या आणि त्यात बदामाचे काप मिसळा. यानंतर सांजाचे आणि कणकेचे छोटे गोळे तयार करा. कणकेचा गोळा हलक्या हाताने लाटून त्यामध्ये सांजाचा गोळा भरावा आणि सावकाश पोळी लाटावी. गरम तव्यावर तूप घालून पोळी दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजावी. पोळी छान फुगल्यावर वरून थोडे केशर आणि साजूक तूप घालावे. अशा प्रकारे पारंपरिक आणि चविष्ट सांज्याची पोळी तयार होते.





