Boiling Egg Hack : अंडं सोलताना तुकडे निघतात? गृहिणीनींनो स्वयंपाकघरातील फक्त 'ही' एक गोष्ट वापरा, नेहमीची कटकट संपवा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर आता काळजी करू नका. तुमच्या स्वयंपाकघरातील काही साध्या गोष्टी वापरून तुम्ही अगदी प्रोफेशनल शेफप्रमाणे अंड्याची साल काही सेकंदात काढू शकता.
"संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे!" हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. प्रथिनांचा (Protein) उत्तम स्रोत म्हणून डॉक्टरही रोज एक उकडलेले अंडे खाण्याचा सल्ला देतात. पण, हेच अंडे उकडल्यानंतर ते सोलणे म्हणजे कधीकधी मोठं टास्क होतं. अनेकदा अंडे सोलताना त्याचे साल हे पांढऱ्या भागाला चिकटून बसतात आणि त्याच्या कडक कवचीसोबत अंड्याचा अर्धा भागही बाहेर येतो. यामुळे अंड्याचा आकार तर बिघडतोच, पण खातानाही मजा येत नाही.
advertisement
advertisement
1. व्हिनेगरची जादू (Vinegar Hack)अंडी उकडताना पाण्यात मीठ टाकणं हे आपल्याला माहिती आहे, पण त्यापेक्षाही प्रभावी उपाय म्हणजे व्हिनेगर. अंडी उकडत असलेल्या पाण्यात फक्त एक चमचा व्हिनेगर टाका. व्हिनेगरमधील आम्लीय (Acidic) गुणधर्मामुळे अंड्याचे कवच थोडे मऊ होते. यामुळे उकडल्यानंतर कवच अंड्याला न चिकटता अगदी सहज वेगळा होतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









