advertisement

सुप्रिया सुळे यांनी भाच्याचा दावा खोडला? रोहित पवार यांच्या आरोपांची धार झटक्यात बोथट!

Last Updated:

अजित पवार यांच्या विमानाचा खरोखर अपघात की घातपात? यावरून अनेक शंका, संशय आणि प्रश्नांचे वादळ उठले आहे.

अजित पवार-सुप्रिया सुळे-रोहित पवार
अजित पवार-सुप्रिया सुळे-रोहित पवार
मुंबई : अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्सचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी सूचक विधान केले आहे. विमानातील ब्लॅक बॉक्स हा उन्हापासून, आगीपासून, बॉम्बस्फोटापासून सुरक्षित आहे पण राजकारण्यांपासून नाही असे त्यांनी म्हटले. त्यांच्या विधानावरून दबक्या आवाजात चर्चा सुरू असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र वेगळा सूर लावला. ब्लॅक बॉक्समधली माहिती मिळेलच, मला त्यात काहीही अडचण वाटत नाही, असे त्या म्हणाल्या. रोहित पवार यांचा दावा खोडून काढल्याने त्यांच्या आरोपांची धार बोथट होणार का, अशी चर्चा आहे.
अजित पवार यांच्या विमानाचा खरोखर अपघात की घातपात? यावरून अनेक शंका, संशय आणि प्रश्नांचे वादळ उठले आहे. अपघातावरून अनेक आरोप प्रत्यारोपही झाले आहेत. पण या सगळ्याचा उलगडा ज्या ब्लॅक बॉक्समधून होईल अशी आशा होती तो ब्लॅक बॉक्सच जळाल्याची माहिती आहे. यावरून रोहित पवार यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. मात्र रोहित पवार यांच्या प्रश्नांची धार बोथट करणारे विधान सुप्रिया सुळे यांनी केल्याने चर्चा रंगली आहे.
advertisement

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगाने रोहित पवार यांनी आक्रमकपणे प्रश्न विचारणे सुरू ठेवले आहे. त्यांनी ब्लॅक बॉक्सवरूनही तपास यंत्रणांना विविध प्रश्न विचारले. अजित पवार यांच्यासोबत असलेले ४ मोबाईल मिळतात पण ब्लॅक बॉक्स मात्र जळतो, असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता, ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत बरीच माहिती आहे. मला विश्वास आहे की तांत्रिकदृष्ट्या ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळेलच. मला त्यात कोणतीच अडचण वाटत नाही, असे त्या म्हणाल्या.
advertisement

सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांचा दावा खोडला?

ब्लॅक बॉक्ससंबंधी माध्यमांत येणाऱ्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे, असे वाटत नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. एकप्रकारे रोहित पवार यांचे ब्लॅक बॉक्ससंबंधीचे दावे सुप्रिया सुळे यांनी खोडून काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रोहित पवार यांनी आक्रमकपणे बाजू लावून धरलेली असताना सुप्रिया सुळे यांनी मात्र रोहित पवार यांच्या आरोपांची धार बोथट केल्याचेच राजकीय जाणकार सांगतात.
advertisement

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्ससंबंधी रोहित पवार काय म्हणाले?

विमानातील ब्लॅक बॉक्स हा उन्हापासून, आगीपासून, बॉम्बस्फोटापासून सुरक्षित आहे पण राजकारण्यांपासून नाही. अजित पवार यांच्यासोबत असलेले चार मोबाईल फोन अपघाताच्या ठिकाणी मिळून येतात. पण विमानातील ब्लॅकबॉक्स मात्र जळतो, डॅमेज अवस्थेत आढळून येतो, हे न पटणारे आहे, असे रोहित पवार म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुप्रिया सुळे यांनी भाच्याचा दावा खोडला? रोहित पवार यांच्या आरोपांची धार झटक्यात बोथट!
Next Article
advertisement
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement