Pune News: लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन्... पुण्यातील घटनेला धक्कादायक वळण; नेमकं काय घडलं?
- Reported by:VAIBHAV SONAWANE
- Published by:Prachi Amale
Last Updated:
महिलेशी वाद घातल्यानंतर 50 ते 55 फूट खोल असलेल्या खाणीत त्यांना ढकलून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
पुणे : पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 40 वर्षीय महिलेचा 6 जणांनी मिळून खून केलाय आहे. 10 फेब्रुवारी मांगडेवाडी येथील दगडाच्या खाणीत महिलेला ढकलून हत्या करण्यात आली होती. संशयित अवस्थेत आढळून आलेल्या या महिलेच्या मृत्यूचे गूढ उलगडले असून महिलेवर आधी बलात्कार करून तिला दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवली जात आ आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमहिला वेश्याव्यवसाय करायची. 8 फेब्रुवारीच्या रात्री साडेनऊच्या सुमारास ती कोंढवा परिसरातील कान्हा चौकात मद्यधुंद अवस्थेत उभी होत्या. त्यावेळी आरोपी केशव कमलेश चौधरी (20), सोन्या लक्ष्मण पवार (18) आणि अब्दुल मोहम्मद शेख (23) यांनी त्यांना पाहिले. तिघांनी शफिया यांना कात्रज येथील एका लॉजवर घेऊन जायचं ठरवले. मात्र लॉजवर न नेता त्यांना मांगडेवाडी येथील क्रशर खाणीजवळील डोंगरावर नेण्यात आले. त्यानंतर काही वेळातच इतर आरोपी महादेव अर्जुन व्होरडे (40), साई अमित पुजारी (19) आणि सोहेल हनीफ खान (20) तेथे पोहोचले.
advertisement
डोंगरावर नेमकं काय घडलं?
मयत महिला आणि आरोपी डोंगरावर मद्यपान करत असताना महिलेने आपल्याला लॉजवर न नेता डोंगरावर का आणले? असा सवाल करत आरोपींसोबत वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात महिलेला मारहाण केली. त्यानंतर सुमारे 50 ते 55 फूट खोल असलेल्या खाणीत त्यांना ढकलून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
advertisement
ओळख पटू नये यासाठी रिक्षाचे हूड बदलले
सीसीटीव्हीमध्ये ओळख पटू नये यासाठी आरोपींनी रिक्षाचे हूड बदलल्याची बाबही तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखा आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी संयुक्तपणे केला. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. सदर प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.
advertisement
मृतदेह सापडल्यानंतर उलगडा
10 फेब्रुवारी रोजी खाणीत महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सुरू आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 3:19 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन्... पुण्यातील घटनेला धक्कादायक वळण; नेमकं काय घडलं?







