Salim Khan: सलमान खानच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज, डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट; सांगितलं व्हेंटिलेटरवर ठेवण्याचं कारण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Salim Khan Health Update: मुंबईच्या लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी आज दुपारी मीडियाशी संवाद साधत सलीम यांच्या तब्येतीची सविस्तर माहिती दिली.
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मुंबईच्या लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी आज दुपारी मीडियाशी संवाद साधत सलीम यांच्या तब्येतीची सविस्तर माहिती दिली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र हे केवळ सुरक्षेचे पाऊल असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
ब्रेन हॅमरेजचा सौम्य झटका, पण शस्त्रक्रिया नाही
बुधवारी दुपारी रुग्णालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना डॉक्टरांनी सांगितलं की, सलीम खान यांना जेव्हा रुग्णालयात आणलं गेलं, तेव्हा ते शुद्धीत होते. तपासणीदरम्यान त्यांच्या मेंदूत थोडा रक्तस्त्राव (Brain Haemorrhage) झाल्याचं समोर आलं. मात्र, तातडीने योग्य औषधोपचार केल्यामुळे हा रक्तस्त्राव नियंत्रणात आला. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, यासाठी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज भासली नाही.
advertisement
यशस्वी DSA प्रोसिजर
आज, १८ फेब्रुवारी रोजी सलीम खान यांच्यावर डीएसए (Digital Subtraction Angiography) ही महत्त्वाची वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आली. न्यूरोसर्जनच्या देखरेखीखाली ही प्रोसिजर पार पडली असून ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे. डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, सलीम खान यांचे वय ९० वर्षे असल्यामुळे कोणतीही रिस्क नको म्हणून त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असून उद्या म्हणजेच गुरुवारी त्यांना व्हेंटिलेटरवरून बाहेर काढले जाईल.
advertisement
डॉक्टरांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी जेव्हा सलीम खान यांना फॅमिली डॉक्टर संदीप चोप्रा रुग्णालयात घेऊन आले, तेव्हा त्यांचा रक्तदाब कमालीचा वाढलेला होता. कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये प्रथमोपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती पाहता त्यांना तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. काही महत्त्वाच्या चाचण्या आणि तपासण्या करण्यासाठी त्यांना व्हेंटिलेटरचा आधार देण्यात आला होता, जेणेकरून शरीराच्या इतर अवयवांवर ताण येऊ नये.
advertisement
वडिलांच्या प्रकृतीची बातमी समजताच सलमान खानने सर्व कामं सोडून रुग्णालयात धाव घेतली होती. काल रात्रीपासून सलमान, अरबाज आणि सोहेल सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या सकारात्मक अपडेटनंतर खान कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 3:13 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Salim Khan: सलमान खानच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज, डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट; सांगितलं व्हेंटिलेटरवर ठेवण्याचं कारण









