advertisement

Salim Khan : सलीम खान यांच्यावर सर्जरी नाही तर DSA Procedure; म्हणजे काय असतं? डॉक्टरांनी सांगितल्या डिटेल्स

Last Updated:
Salim Khan DSA Procedure : सलमान खानचे वडील सलीम खान यांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया नाही तर डीएसए प्रोसिजर करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ही प्रक्रिया नेमकी काय असते, याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.
1/5
सलमान खानचे वडील सलीम खान यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल अशी चर्चा होती. दरम्यान आता सलीम खान यांना ज्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या रुग्णालयाने त्यांच्या आरोग्याबाबत अपडेट दिली आहे.

2/5
लीलावती रुग्णालयातील डॉ. डॉ. जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सलीम खान यांच्यावर सर्जरी झालेली नाही, त्यांच्यावर एक छोटीशी प्रोसिजर झाली आहे. त्याला सर्जरी म्हणू नका. डॉ. जलील यांनी सलीम यांच्यावर DSA प्रोसिजर झाल्याचं सांगितलं. ही सर्जरी नाही मग नेमकं काय आहे? याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.

3/5
न्यूरोलॉजिस्ट डॉ. बिपलाब दास यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर याबाबत माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी सांगितलं की, अँँजिओग्राफीचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यात डीएसए ही हाय लेव्हलची अँजिओग्राफी आहे. याच्यावर हाय सेन्सिटिव्ही किंवा अचूक अँजिओग्राफी आहे. हा नसांचा एक्स-रे आहे. नसांमधील समस्या यामुळे दिसतात.

4/5
हा उपचार नाही तर उपचाराची दिशा ठरवण्याची, निदानाची प्रक्रिया आहे.  लकवा मारलेले, ब्रेन हॅमरेज किंवा मेंदूची कोणती समस्या असलेल्या रुग्णांसाठी ही प्रक्रिया वापरली जाते. यामुळे मेंदूत गाठ, सूज, रक्तस्राव, रक्तवाहिनीतील अडथळे किंवा गुठळ्या याबाबत माहिती मिळते. यानुसार यावर उपचार काय करायचं हे ठरतलं जातं.

5/5
आता ही प्रक्रिया कशी केली जाते. तर याबाबत माहिती देताना डॉ. बिपलाब दास यांनी सांगितलं की, हाताच्या मनगटावर किंवा पायाच्या जांघेतून एक कॅथेटर टाकलं जातं. रुग्ण शुद्धीवर असतानाच ही प्रक्रिया केली जाते. जिथून कॅथेटर टाकलं जातं, त्या जागेला सुन्न केलं जातं. कॅथेटर मानेपर्यत नेणं पुरेसं असतं, मेंदूपर्यंत जाण्याचीही गरज नसते. 10-15 मिनिटांची आणि सुरक्षित अशी ही प्रक्रिया आहे.

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement