advertisement

Nashik News: सावधान! स्वस्तातली कुल्फी बेतेल जीवावर, भेसळयुक्त आईस्क्रीम बनवण्याचं रॅकेट उघड

Last Updated:

Igatpuri Ice- Cream Adulteration: नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीमध्ये भेसळयुक्त आणि केमिकलयुक्त कुल्फी बनवणाऱ्या कारखान्यावर धडक कारवाई केली आहे. कारवाईमध्ये कुल्फी आणि केमिकल्स जप्त केले आहे.

nashik rural police has taken strict action against a factory in igatpuri that was manufacturing adulterated and chemically enriched kulfi
nashik rural police has taken strict action against a factory in igatpuri that was manufacturing adulterated and chemically enriched kulfi
गेल्या आठवड्यामध्ये अहिल्यानगर मध्ये स्थानिक अन्न- औषध प्रशासन विभागाकडून भेसळ दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्या प्रकरणी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली होती. अहिल्या नगरमधील प्रकरण ताजं असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी केमिकल्सचा वापर करून कुल्फी तयार करणाऱ्या कारखान्यावर धडक कारवाई केली आहे. केमिकल आणि इसेन्सचा वापर करून विना परवाना कुल्फी बनवणाऱ्या कारखान्यातून नाशिक ग्रामीण पोलि‍सांनी हजारो कुल्फ्या आणि केमिकल्स जप्त केले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या बेधडक कारवाईमुळे अनधिकृत काम करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
बेधडक पोलीस कारवाई
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुल्फी खाणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे स्वस्तात मस्त अशा कुल्फी बनवून विकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. या सर्व प्रकरणांवर आधीच आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी बेधडक कारवाई सुरू केली आहे. नाशिक ग्रामीण पोलि‍सांना नाशिकच्या इगतपुरीतील चर्च हील परिसरात एका जुन्या घरात केमिकल पासून कुल्फ्या बनवल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलि‍सांनी या सर्व प्रकाराची शहानिशा केल्यानंतरच कारखान्यावर छापा टाकला. पण पोलि‍सांनी छापा टाकल्यानंतर जे चित्र समोर होतं ते बघून पोलिसांनाही धक्का बसला. मलाई कुल्फी बनवण्यासाठी सामान्यत: दूध आणि दुधाची मलई याचा उपयोग करून कुल्फी बनवली जाते.
advertisement
भेसळीचे साहित्य जप्त
मात्र या कारखान्यामध्ये कोबिंद कलर पोस्टर, इसेन्स आणि फ्लेवर कलर ज्यातून मानवी शरीराला हानी पोहोचते. अशा हानिकारक असलेल्या केमिकलपासूनच कुल्फी बनवली जात असल्याचं धक्कादायक चित्र उघडकीस आलं. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी अन्न औषध प्रशासनाला घटनास्थळी पाचारण करत या कारखान्यावर कारवाई केली आहे या कारवाईत 2500 बनावट कुल्फ्या आणि केमिकलचे डबे जप्त करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी इगतपुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक- सारिका अहिरराव यांच्याकडून केली जात आहे. नाशिक ग्रामीण पोलि‍सांनी केलेल्या कारवाईमध्ये मोठ- मोठ्या शहरांमध्ये विकल्या जाणारी मलई कुल्फी कशा पद्धतीने तयार केली जाते, याचे पितळ उघड केलं आहे.
advertisement
अटकेची कारवाई
दुधाच्या किंमती आणि बाजारात मिळणाऱ्या कुल्फीतील तफावत ग्राहकांनी समजून घ्यायला हवी. विनाभेसळ दूध आणि मलईपासून बनवली जाणारी कुल्फी पाच आणि दहा रुपयांना मिळूच शकत नाही, असं असताना लोकं अशा स्वस्तातील मिळणाऱ्या कुल्फ्या खरेदी करतात, त्यामुळे नागरिकांनी आपल्या मुलांना आपण कुल्फीच्या आडून विष खाऊ घालतो आहे का? याचा विचार करूनच कुल्फी खरेदी करावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. नाशिकच्या इगतपुरी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत कारखाना चालवणारा संशयित विनोद कुशवाह याच्या विरोधात विनापरवाना कुल्फी कारखाना चालवणे आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या कुल्फ्या आणि केमिकलचे नमुने अन्न औषध प्रशासनाच्या मदतीने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणात पुढची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान या कारवाई मुळे कुल्फीतील जीवघेणी भेसळ उघड झाली आहे, त्यामुळे आपणही अशा कुल्फ्या जर घेत असाल तर काळजी घ्या.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: सावधान! स्वस्तातली कुल्फी बेतेल जीवावर, भेसळयुक्त आईस्क्रीम बनवण्याचं रॅकेट उघड
Next Article
advertisement
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement