advertisement

Nashik News: नाशिककर तुमच्या मुलांना कोचिंग क्लास लावतायत? होऊ शकते मोठी फसवणूक; नेमकं काय आहे प्रकरण

Last Updated:

नाशिक पोलिसांनी कोचिंग क्लासेसच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली आहे.

nashik police have busted a gang involved in cheating in the name of coaching classes six people have been arrested from rajasthan
nashik police have busted a gang involved in cheating in the name of coaching classes six people have been arrested from rajasthan
नाशिक: अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकमध्ये होत असलेल्या कोचिंग क्लासच्या नावाखाली फसवणुकीचे सर्व गुपित उघडले आहे. पोलि‍सांनी सर्व आरोपींना राजस्थान मधून अटक केली आहे. 'कोटा आयआयटी अकॅडमी कोचिंग क्लासेस'च्या नावाने क्लास सुरू करण्यात येणार होता. परंतु कोचिंग क्लासेसच्या नावाने पालकांना फसवणाऱ्या टीमने अनेक वेगवेगळे कारणं देत त्यांच्याकडून मुलांच्या क्लासेसच्या लाखो रूपये फी सुद्धा घेतली. मुलांच्या फीचे पैसे घेऊन ते सहाही जणं तिथून पसार झाले.
2017 पासून नाशिककरांचा विश्वास संपादन करून भोजावत कुटुंबाने नाशिकमध्ये 'कोटा आयआयटी अकॅडमी कोचिंग क्लासेस' सुरू केला होता. पालकवर्गांमध्ये आपला विश्वास संपादन करून भोजावत कुटुंबाने पालकांकडून मोठ्या रकमेने फी उकळली. तर काही जणांकडून क्लासेसमध्ये भागीदारी बनवण्याच्या हेतूने लाखो रूपये घेतले होते, दुसर्‍या जागी क्लासेस सुरू करायचा आहे, असं सांगून भोजावत कुटुंबाने लाखो रूपये घेतले होते. अशा वेगवेगळ्या माध्यमातून घेतलेल्या पैशांच्या माध्यमातून त्यांनी घेतलेली लाखो रूपयांची मालमत्ता विकून ते कुटुंबासह राजस्थानच्या भिलवाडामध्ये पळून गेले.
advertisement
या प्रकरणी सर्व पालकवर्गांकडून आणि गुंतवणूक दारांकडून अंबड पोलि‍सांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकरणाचा एकत्रित पद्धतीने तपास करत असताना अंबड गुन्हे शाखेला संशयित भोजावत कुटुंब हे उच्चशिक्षित आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ असल्याचे समजले. हे सर्व आरोपी इतके हुशार की, आपण पोलिसांच्या कचाट्यात येऊ नये म्हणून त्यांनी कुठलाही पुरावा पाठीमागे सोडला नाही. तांत्रिक विश्लेषण विभागाच्या म.स.पो.नि. (महानगर सहाय्यक पोलीस निरीक्षक) जया तारडे यांना हे सर्व आरोपी राजस्थानच्या भिलवाड्यामध्ये अस्तित्वामध्ये असल्याचे समजले. पण नेमके ते कुठे राहत होते, याची माहिती नव्हती.
advertisement
राजस्थानच्या भिलवाड्यामध्ये त्यांनी नव्याने कोचिंग क्लास सुरू केल्याची माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शाखा अंबड गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, श्रीराम पाटील, गंगापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने राजस्थानच्या भिलवाड्यामध्ये जाऊन संशयितांचा शोध घेतला. तिथेही पालकांना त्याच पद्धतीने फसवून त्यांच्याकडून क्लासेसच्या नावाने पैसे घेऊन फसवणूक केल्याची माहिती मिळाली. भोजावत कुटुंबीयांच्या विरोधात बिकानेर, गंगाशहर आणि राज्यस्थानमध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. तेव्हापासूनच राजस्थान पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.
advertisement
स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित सुरेंद्र मानसिंग भोजावत (43), जयसिंग मानसिंग भोजावत (45), उमा कवर सुरेंद्रसिंग भोजावत (41), दीपा जयसिंग भोजावत (43), नवरतन मानसिंग भोजावत (66), मानसिंग छोंगसिंग भोजावत (78) यांना राजस्थानच्या भिलवाड्यातून राहत्या घरून ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सर्व संशयितांना पुढील तपासासाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: नाशिककर तुमच्या मुलांना कोचिंग क्लास लावतायत? होऊ शकते मोठी फसवणूक; नेमकं काय आहे प्रकरण
Next Article
advertisement
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement