आरोग्यासाठी पौष्टिक, सोप्या पद्धतीने घरीच बनवा सोयाबीन खिमा, रेसिपीचा संपूर्ण Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
दररोजच्या जेवणात काहीतरी वेगळं आणि पौष्टिक बनवायचं असेल तर सोयाबीन खिमा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. प्रथिनांनी समृद्ध असलेली ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे.
मुंबई : दररोजच्या जेवणात काहीतरी वेगळं आणि पौष्टिक बनवायचं असेल तर सोयाबीन खिमा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. प्रथिनांनी समृद्ध असलेली ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे. शिवाय कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी सध्या गृहिणींमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
सोयाबीन खिमा साहित्य
1 कप सोयाबीन
1 मोठा कांदा (बारीक चिरलेला)
1 टोमॅटो (बारीक चिरलेला)
1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट
1/2 टीस्पून हळद
1 टीस्पून लाल तिखट
1 टीस्पून गरम मसाला
1/2 टीस्पून धणे-जिरे पावडर
मीठ चवीनुसार
2 टेबलस्पून तेल
कोथिंबीर (सजावटीसाठी)
सोयाबीन खिमा कृती
प्रथम सोयाबीन गरम पाण्यात 10 मिनिटे उकळून घ्या. नंतर पाणी काढून हलकेच पिळून घ्या. पाण्यातून काढलेले सोयाबीन मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्या. कांदा गुलाबी झाल्यावर आलं-लसूण पेस्ट घालून परता. त्यानंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. आता हळद, लाल तिखट, धणे-जिरे पावडर आणि मीठ घालून मसाला चांगला परता. त्यात वाटलेले सोयाबीन घालून 5–7 मिनिटे झाकण ठेवून शिजवा. शेवटी गरम मसाला आणि कोथिंबीर घालून एकदा हलवा.
advertisement
सर्व्हिंग टिप
गरमागरम सोयाबीन खिमा चपाती, भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा. पौष्टिक, चविष्ट आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी नक्की करून पाहा आणि कुटुंबासोबत आनंद घ्या!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 7:21 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
आरोग्यासाठी पौष्टिक, सोप्या पद्धतीने घरीच बनवा सोयाबीन खिमा, रेसिपीचा संपूर्ण Video









