82 वर्षांच्या 'तरुण' आजोबांची 'सेकंड इनिंग', नांदेडच्या निवृत्त शिक्षकाला मिळाली नवरी, जोडी हजला रवाना!
- Reported by:Mujeeb Shaikh
- Published by:Sachin S
Last Updated:
नांदेड जिल्ह्याातील धर्माबाद इथं राहणारे एका ८२ वर्षीय 'तरुण' आजोबांचा निकाह पार पडलाा आहे. ३ मुले, ३ सुना, ३ मुली, ३ जावई आणि तब्बल २२ नातवंडं असा मोठा गोतावळा असलेल्या या सेवानिवृत्त शिक्षकाने ५० वर्षीय महिलेसोबत निकाह केला.
वय हा फक्त एक एक आकडा आहे, असं नेहमी म्हटलं जातं. उतार वयात माणसं देवधर्म आणि नातवंडांना सांभाळण्याची जबाबदारी सांभाळत असतात. पण, नांदेड मध्ये एका ८२ वर्षीय तरुण आजोबांनी लग्नबेडीत अडकून दाखवलं आहे. घरात ३ मुलं, ३ सुना, ३ मुली, ३ जावई आणि तब्बल २२ नातवंडं असा मोठा गोतावळा असलेल्या या सेवानिवृत्त शिक्षकाने वयाच्या 82 व्या वर्षी निकाह केला आहे. या आजोबांची पाटर्नर ही एक ५० वर्षीय महिला आहे. आता हे आजोबा आपल्या पत्नीसोबत हजसाठी साऊदी अरेबियाला गेले आहे.
advertisement
नांदेड जिल्हयातील धर्माबाद इथं राहणारे 82 वर्षीय चौधरी शेख हुसेन शेख अहमद असं लग्न करणाऱ्या नवरदेवाचं नाव आहे. मूळचे माहूरचे रहिवासी असलेले हुसेन शेख हे नोकरीनिमित्त धर्माबादला स्थायिक झाले. इथं उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये ३५ वर्षे ज्ञानदानाचं काम केलं. त्यानंतर २२ वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







