फिलिपाईन्स येथील यबरा स्कॉलर्स अँड फेलो सोसायटी संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांची नेहमीच दाखल घेऊन त्यांना सन्मानित करत असते. त्यानुसार नुकताच यबर्रा स्कॉलर्स अँड फेलो सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय समितीकडून कोल्हापूरच्या अनुप्रियाला भारतातील यबरा राजदूत म्हणून सन्मानित करण्यात आले. कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोड परिसरातील गंधर्व नगरी येथे राहणारी अनुप्रिया अमितकुमार गावडे ही फक्त 11 वर्षांची मुलगी आहे. ती सध्या शांतिनिकेतन विद्यालय येथे सहवीत शिक्षण घेत आहे.
advertisement
फिलीपिन्स मधील एका हॉटेल आणि रिसॉर्टच्या ग्रँड बॉलरूम येथे आयोजित एका भव्य समारंभात हा सन्मान अनुप्रियाला बहाल करण्यात आला. हैतीमधील थिओफनी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि भारतातील अल्गिलानी फाउंडेशन सेंटर फॉर एक्सलन्स ISO 9001:2015 या आंतरराष्ट्रीय कार्यालयांच्या शिफारसी आणि नामांकनानुसार तिला हा सन्मान देण्यात आला आहे. यासाठी अनुप्रियाची आजवरची अतुलनीय शैक्षणिक आणि सामाजिक कामगिरी आणि विविध क्षेत्रात तिने दिलेल्या अनुकरणीय योगदानाची दखल घेण्यात आली आहे. तसेच आता यबरा विद्यापीठाची राजदूत बनून अनुप्रिया बाल हक्क कायदा आणि संरक्षणासाठी काम करणार असल्याचे अनुप्रियाच्या आई अक्षता गावडे यांनी सांगितले.
अनुप्रयाची कामगिरी आणि सन्मान
अनुप्रियाने आजवर 5 विश्वविक्रम आपल्या नावे केलेले आहेत. ऑलिम्पियाड या कठीण परीक्षेत देखील तिने जगात अव्वल येत 50 पेक्षा जास्त सुवर्णपदकांची कमाई केलेली आहे. त्याचबरोबर पन्नासहून अधिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांची ती मानकरी ठरलेली आहे. तिच्या कामगिरीमुळे युनायटेड नेशन्स जिनिव्हा आणि UNESCO सारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थांकडून तिला मानद डॉक्टरेट मिळालेली आहे. तसेच फ्लोरिडा, यूएसए मधील महात्मा गांधी पीस फाऊंडेशनने मानद प्रोफेसरशिप देखील तिला बहाल केलेली आहे. भारतीय संविधानाबद्दल जाणीव ठेवून जनजागृतीचे कार्य देखील ती करत आहे. तिच्या या कामगिरीचा चढता आलेख लक्षात घेऊनच आता तिला हा यबरा विद्यापीठाकडून सन्मान मिळाल्याचे अक्षता गावडे यांनी स्पष्ट केले.
राज्यस्तरीय खेळात वर्ध्याचा डंका, सोलापूर गाजवून दिल्लीला धडक, Video
बाल हक्क कायदा आणि संरक्षणासाठी यबरा विद्यापीठाची मी भारतातील राजदूत म्हणून काम करणार आहे. त्यामुळे आतापर्यंत मी बालहक्क या संदर्भात काम करत आले आहे. यापुढेही त्याचप्रमाणे लहान मुलांना त्यांचे हक्क आणि अधिकार काय आहेत याची जाणीव करुन देईन, असे मत अनुप्रियाने व्यक्त केले आहे.
दिवसाला 40 अंडी अन् किलोभर चिकनचा खुराक, पोलीस कॉन्सटेबलचा अमेरिकेत धमाका!
दरम्यान अनुप्रियाच्या प्रभावशाली प्रवासाचे 'भारताचे रायझिंग सुपरस्टार्स' यासारख्या प्रकाशनांमध्ये वर्णन केला गेला आहे. अनुप्रियाची झेप जागतिक स्तरावर गाजली आहे. तल्लख बुध्दीमत्ता, अष्टपैलू व्यक्तीमत्व या जोरावर अनुप्रियाने केलेल्या कामगिरीमुळे सर्वच वयोगटातील व्यक्तींना प्रेरणा दिली आहे.