हिप्परगी धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले
चार दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने हिप्परगी धरणाचे दरवाजे काही काळ बंद केले होते; पण शनिवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने संध्याकाळी पुन्हा दरवाजे उघडण्यात आले. सध्या हिप्परगी धरणात 67 हजार 300 क्युसेक पाण्याची आवक होत आहे, तर 66 हजार 550 क्युसेक पाणी सोडले जात आहे. यामुळे राजापूर बंधाऱ्यातून 79 हजार क्युसेक पाणी कर्नाटकात सोडले जात आहे.
advertisement
कृष्णा नदीतील प्रवाह वाढला
अलमट्टी धरणातूनही पाण्याची आवक आणि विसर्ग वाढला आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील प्रवाह खूपच वाढला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी शनिवारी सायंकाळी सहा वाजता दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. यामुळे सध्या 29 हजार 646 क्युसेक पाणी सोडले जात आहे. शनिवारी रात्री नदीची पातळी 25 फूट होती; पण रात्रीतून जोरदार विसर्ग झाल्याने ती वाढून 29 फूट 4 इंच झाली.
34 तासांत पंचगंगा नदीपातळीत 7 फूटांची वाढ
रविवार दिवसभरात ती आणखी वाढून 32 फुटांवर पोहोचली. हे वाढते पाणी लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. वारणा नदीतून सध्या 15 हजार 75 क्युसेक पाणी सोडले जात आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात वाढून पुलाजवळ 41 फूट झाली आहे, तर राजाराम बंधाऱ्यातून 35 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. 24 तासांत कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पातळीत सात फुटांची वाढ झाली आहे.
हे ही वाचा : Weather Alert: मंगळवारी हवामानात मोठे बदल, 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
हे ही वाचा : जन्मदाखल्यावर QR कोड नाही? मग 'आधार कार्ड' मिळणार नाही; शासनाचा नवा नियम, नागरिकांना त्रास!