या प्रकरणी सहायक कामगार आयुक्त रोहित विश्वनाथ गोरे (वय-34, रा. विश्रामबाग, सांगली) यांनी मंगळवारी रात्री कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनंतर पोलिसांनी 25 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, यामध्ये एजंट आणि बांधकाम कामगार दोघांचाही समावेश आहे.
कामगार अन् एजंट यांचे धाबे दणाणले
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम कामगार कल्याण योजनांतर्गत अनेक लाभांची सुविधा दिली जाते. या लाभांसाठी बनावट कागदपत्रे सादर करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता या घटनेतून समोर आली आहे. यापूर्वी राज्यात अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने बांधकाम कामगार आणि एजंट यांच्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे योजनेंतर्गत वाढलेली गैरशिस्त आणि लाचखोरीचे प्रकारही समोर आले आहेत.
advertisement
फसवणुकीमुळे शासनाचे मोठे नुकसान
सहायक कामगार आयुक्त रोहित विश्वनाथ गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम कामगार कल्याण योजनेतर्गत लाभ घेण्यासाठी काही व्यक्तींनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केली, तर काहींनी चक्क मृत व्यक्तींच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने दाखवून योजनांचा लाभ मिळवला. या सर्व अनियमितता आणि फसवणुकीमुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हे ही वाचा : पत्नी, सासूला दगडाने ठेचून मारलं, मृतदेह पुरून लावली केळीची झाडं; थरारक हत्याकांड असं आलं समोर
हे ही वाचा : लघुशंकेसाठी उतरला अन्..! दबा धरून बसलेल्या चोरट्यांचा कुरियर बाॅयवर हल्ला; 70 लाखांचं सोनं केलं लंपास
